दर पत्रक लावण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायत महानगरची मागणी

परभणी,दि 04 ः
ई महासेवा केंद्र,आपले सरकार मध्ये दरपत्रक लावण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी महानगर वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले करण्यात आली

परभणी जिल्ह्यातील सामान्य ग्राहकांना आवश्यक दस्तावेज व प्रमाणपत्र साठी इतरत्र कुठे भटकू नये व त्यांना एकाच छत्राखाली सर्व सेवा उपलब्ध केले आहेत. शासनाने ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र सेतू केंद्र,आधार केंद्र, इत्यादी ची सुविधा करून दिली आहे .ज्यामध्ये आधार कार्ड, जातप्रमाणपत्र, नेशनिलीटी, डोमिसैल, एफिडेट, रेशनकार्ड, राजपत्र अशा अनेक सेवा उपलब्ध आहेत सोबतच ग्राहकांची लूट होऊ नये म्हणून शासनाने यासाठी लागणारे दर शुल्क सुद्धा निश्चित करून दिलेली आहेत. परंतु काही केंद्र संचालक द्वारा केंद्रावर सेवानुसार दर शुल्काचे फलक (रेट बोर्ड) न लावल्याने नागरिका मध्ये शुल्क विषय संभ्रम निर्माण होतो व जास्तीचा आगाऊ शुल्क घेऊन त्यांची आर्थिक फसणूक केली जात आहे.

शासनाने सर्वच केंद्रा साठी एक समान दर निश्चित केला असून ही शुल्क दर फलक न लावल्यामुळे ग्राहकांना शुल्काची माहिती मिळत नाही. यामुळे ते फसणुकी चे बळी पडतात . परभणी व जिल्ह्यातील सर्व तालुके व ग्रामीण मधील सर्व ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतू केंद्र, आधार केंद्र संचालकांना आपल्या केंद्रात शुल्क दर फलक (रेट बोर्ड) दर्शनी भागात अती आवश्यक लावणे विषयी अधिसूचना / आदेश काढून सक्तीने सूचना द्यावे. अशी मागणी जिल्हाधिकारी परभणी यांना एका निवेदनाद्वारे अखिल भारतीय ग्राहक पंचायत महानगर चे अध्यक्ष अब्दुल रहीम, संघटक सखाराम चव्हाण, सदस्य बाबासाहेब भोसले, चंद्रकांत घाडगे, मुजीब खान पठाण, सुग्रीव पैठणी आदींनी केली आहे.

Comments (0)
Add Comment