सेलुत मुस्लिम समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

सेलु / प्रतिनिधी
मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर स. अ. यांच्या बद्दल अपशब्द वापरणारे रामगीरी महाराज व मुस्लिम समाजाच्या भावना भडकावणार्‍या आमदार नितेश राणे विरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हजारो मुस्लिम बांधवाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले .
आज शुक्रवार रोजी शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर दुपारी दोन ते पाच दरम्यान धरणे आंदोलन करण्यात आले.धार्मिक तेढ निर्माण करणार्या लोकांवर UAPA अंतर्गत कडक कारवाई करावी तसेच प्रेषित मुहम्मद पैगंबर सअ व ईतर धर्मगुरू बद्दल अश्या प्रकारच्या बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या विरूद्ध कडक कायदे करण्यात यावे या मध्ये कठोर शिक्षा देण्याचं तरतुद करण्यात यावी तसेच वक्फ संशोधन बिल 2024 परत घेण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन तहसीलदार शिवाजी मगर यांच्या मार्फत शासनास देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, उपस्थित होते.
या निवेदनावर मोलाना खाजा अहमद कासमी, मुफ्ती बिलाल, मौलाना नसरुला, अब्दुल अजीज, मोहम्मद याहीया मोहम्मद अफजल, सय्यद इम्रान हाश्मी, पठाण सोहेल खान,जकियोदीन सिद्दीकी,शेख रहीम शेख गुलाम, रहीम खा पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहे
आज झालेल्या धरणे आंदोलन कार्यक्रमात शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला

Comments (0)
Add Comment