सेलू / नारायण पाटील – राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथे पार पडलेल्या तलवारबाजी (गटका) स्पर्धेत सेलू जिल्हा परभणी येथील दिव्या रामप्रसाद घोडके हिने दैदिप्यमान कामगिरी करत “रजत पदक” पटकावले आहे.
दिव्या घोडके ही सेलू येथील नुतन कन्या प्रशालेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच तिला आभ्यासाबरोबर तलवारबाजी, काठी, बॉक्सिंग आदी खेळांची आवड होती. वडील रामप्रसाद घोडके यांनी तिच्या कलागुणांना ओळखून प्रोत्साहन दिले. मास्टर पंकज सोनी, किशोर ढोके, पांडूरंग अंभुरे, नागेश कान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्याने विविध खेळांचे धडे घेतले. तिला तीस प्रकारच्या काठ्या व सात प्रकारच्या तलवारी फिरवता येतात. आत्तापर्यंत तिने सहा गोल्डमेडल, दोन सिल्वरमेडल व एक कास्यपदक प्राप्त केले आहेत.
तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्राहक पंचायत चे प्रांत अध्यक्ष डाॅ विलास मोरे, भाजपा शहराध्यक्ष अशोक अंभुरे, गंगाधर कान्हेकर, प्रा. नागेश कान्हेकर, सतीश जाधव, बाळासाहेब काष्टे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.