नवी दिल्ली, 14 मे: भारतात गुंतवणूक करताना बँक फिक्स्ड डिपॉझिट हा सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय मानला जातो. बहुतेक भारतीय नियमितपणे FD मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मे 2022 पासून वाढत्या FD व्याजदरामुळे देखील हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय बनला आहे. फक्त पगारदार वर्ग किंवा ज्येष्ठ नागरिकच नाही तर मिलेनियल्स देखील टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्यास रस दाखवतात. मनी एक्सपर्ट्स सांगतात की गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असूनही, एफडीमध्येही अनेक कमतरता आहेत. त्यामुळे गुंतवणूकदाराने याची जाणीव ठेवायला हवी. एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत. आज आम्ही तुम्हाला FD मध्ये गुंतवणूक करण्याचे 9 तोटे सांगणार आहोत.
1. कमी रिटर्न
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीचा तोटा असा आहे की, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये निश्चित व्याज दिले जाते. जे सहसा स्टॉक किंवा म्युच्युअल फंडांसारख्या इतर गुंतवणूक पर्यायांद्वारे ऑफर केलेल्या रिटर्नपेक्षा कमी असते.
2. निश्चित व्याजदर
फिक्स्ड डिपॉझिटचा आणखी एक दोष म्हणजे अर्जाच्या वेळी व्याजदर निश्चित केला जातो. ज्यावेळी तुम्ही ठराविक व्याजदराने FD उघडता तेव्हा तुम्हाला त्या दराने मुदत संपेपर्यंत व्याज मिळत राहते.
3. लॉक-इन-पीरियड
एकदा तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक केली की, तुमचे पैसे डिपॉझिटच्या कालावधीसाठी लॉक केले जातात. म्हणजेच तुमची मुदत संपेपर्यंत तुम्ही पैशांचा उपयोग करु शकत नाही.
4. TDS
तुम्ही FD वर मिळवलेले व्याज हे टॅक्सेबल इन्कम आहे. म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या व्याजावर टॅक्स भरावा लागेल. FD व्याज ‘Income from Other Sources’ या श्रेणीत येते.
5. महागाई
टॅक्स विचारात घेतल्यानंतरही, गुंतवणुकीवरील रिटर्न हा महागाईच्या दरापेक्षा अधिक असावा. एफडीवरील व्याजदर हा महागाईच्या दरापेक्षा कमी असतो. अशा वेळी, जर FD महागाईला मात देणारा परतावा देत नसेल, तर त्यात गुंतवणूक करणं फायद्याचं नाही. तुमच्या FD वरील व्याजदरापेक्षा महागाईचा दर जास्त असल्यास, तुमच्या पैशाचे मूल्य कालांतराने घसरते.
6. लिक्विडिटी
तुम्हाला FD मध्ये लिक्विडिटी समस्या असते. जर तुम्ही गरजेच्या वेळी एफडी तोडली तर तुम्हाला त्यावर प्री-मॅच्युअर पेनल्टी भरावी लागेल.
7. कोणतेही कॅपिटल गेन्स नाही
तुम्हाला FD वर कोणताही कॅपिटल गेन्स मिळत नाही.
8. बँक दिवाळखोर होऊ शकते
एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, परंतु बँक दिवाळखोरीचा धोका नेहमीच असतो. असे झाल्यास, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा सर्व किंवा काही भाग गमावू शकता.
9. प्रीमॅच्योर विड्रॉलवर दंड
बँका ठेवीदारांना त्यांच्या FD मधून प्रीमॅच्योर विड्रॉलचा पर्याय देतात. मात्र त्यांना मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी शुल्क भरावे लागेल.