सेलूत माणुसकीचे द्वारच्या माध्यमातून बेघरांना वस्त्र व अन्नदान

सेलू / नारायण पाटील – ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सेलू व शांतिदूत परिवार पुणे यांच्या प्रेरणेने सेलूत सुरू असलेल्या माणुसकीचे प्रवेशद्वार अंतर्गत ” एक हात मदतीचा ” या उपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून 21 ऑगस्ट बुधवार रोजी सेलू येथील परभणी रोडवरील मधुसूदन जिनिंग प्रेसिंग च्या परिसरात असलेल्या झोपडपट्ट्यावरील मजुरांना सेलू येथील डॉक्टर दीपक सासवडे व दानशूर मंडळीच्या वतीने देण्यात आलेल्या कपड्याचे वस्त्रदान ऑन द स्पॉट जाऊन संस्थेचे अध्यक्ष डी व्ही मुळे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी मजुरांच्या मुलांना खाऊचे देखील वाटप करण्यात आले.

 

 

याप्रसंगी शेषराव मगर तसेच जिजामाता शाळेतील शिक्षक श्री धनवे व वाहन चालक पैजुद्दीन आदीची उपस्थित होते.
ही सर्व राजस्थान मधून आलेली मजूर मंडळी असून उघड्यावर झोपड्या टाकून पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर कामाला जातात.व त्यातूनच त्यांची चूल पेटते व कुटूंबियांना अन्नाचा पोटभर घास भेटतो .अशा शहरात कोणत्याही प्रकारचा निवारा व आधार नसलेल्या मजुरांना एक हात मदतीच्या माध्यमातून मिळालेली मदत निश्चितच त्यांना आनंद देणारी ठरली असून त्यांनी आनंदाने वस्त्रदान व अन्नदान स्वीकारले .

 

हात मदतीचा या उपक्रमांअंतर्गत जेष्ठ पत्रकार डी व्ही मुळे गेल्या कित्येक दिवसापासून गरजवतांना अन्न व वस्त्र दानाचे पवित्र कार्य करीत असून शहरातील अनेक दानशूर व्यक्ती त्यांच्या या अभिनव उपक्रमाला सहकार्य करीत आहेत .

Comments (0)
Add Comment