सेलू ( नारायण पाटील )
येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल महादेव माणिकराव आगजाळ यांना अत्यंत प्रतिष्ठेचा डॉ.पारनेरकर महाराज स्मृती ग्रंथालय भूषण सेवाव्रती पुरस्कार जाहीर झाला आहे.
पारनेर (जि.नगर) येथील डॉ.पारनेरकर महाराज स्मृती सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने आयोजित सरस्वती महोत्सवात शनिवारी, २१ ऑक्टोबररोजी आगजाळ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी विद्यासागर डॉ.विष्णु महाराज पारनेरकर यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. पुरस्कारबाबत ग्रंथालयाचे अध्यक्ष ॲड.गुणेश वि.पारनेरकर, सचिव तिलोत्तमा गोडबोले यांनी कळविले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आगजाळ यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.