गुगळेश्र्वर विद्यालयास प्रल्हादराव कान्हेकर यांच्या कडून ५१ हजारांची देणगी

सेलू ( नारायण पाटील )

तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील गुगळेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उदघाटन गो. बा.शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रल्हादराव कान्हेकर यांच्या हस्ते झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष विठ्ठलराव डख तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्याक चंद्रशेखर नावडे ,कस्ट्राईब शिक्षक संघटनेचे माराठवाडा कार्याध्यक्ष धम्मपाल उघडे,सरपंच अतुल डख,संस्था सदस्य सुरेशराव डख,सुभाष बोबडे गो.बा.शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुनीलबापू डख,संस्था सचिव रमेश डख, सिमुर गव्हाणचे सरपंच विष्णू उगले,डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष सतीश आकात, मुख्याध्यापक अमोल पवार, मुख्याध्यापक युवराज ब्रम्हराक्षेयांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक गो.बा.शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री प्रल्हादराव देशमुख कान्हेकर यांनी गुगळेश्वर विद्यालयास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा च्या दृष्टीने उपयुक्त शालेय साहित्य खरेदीसाठी ५१ हजार रुपये देणगी दिली.वार्षिक स्नेह संमेनात विद्यार्थ्यांनी शिवरायांचा राज्या भिषेक सोहळयाचा अनोखा देखावा व नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन युवराज ब्रम्हराक्षे तर पवार यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसहशिक्षक आबासाहेब गव्हाणे,लक्ष्मण ताल्डे,अश्विनी जोशी ,उगले मॅडम, शामबालावैष्णव,निकिता नवघरे,कर्मचारी अनिल ब्रह्मराक्षे, केशव कवडे, जगताप राजेभाऊ , मोरे पावन आदींनी परिश्रम घेतले.

Comments (0)
Add Comment