लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या दाव्यानं राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) खळबळ माजली आहे. 29 जुलै रोजी संसदेत केलेल्या चक्रव्यूह भाषणानंतर अंमलबजावणी संचालनालय (ED) त्यांच्या घरावर छापा टाकण्याची योजना आखत आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मी आतुरतेनं ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांची वाट पाहत आहे, असंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. ईडीच्या सूत्रांनीच यासंदर्भात माहिती दिल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट करत राहुल गांधी यांनी ईडीच्या छापेमारीबद्दल दावा केला आहे. ट्विटर पोस्टमध्ये राहुल गांधींनी ईडीच्या छाप्याबद्दल दावा केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “वरवर पाहता, माझं चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एकाला आवडलेलं नाही. ईडीच्या आतल्या लोकांनी मला सांगितलं की, तुमच्या घरावर छापेमारीची तयारी केली जात आहे. मी आतुरतेनं ईडीची वाट पाहत आहे. मी स्वतःच्या हातानं त्यांना चहा आणि बिस्किटं खाऊ घालणार आहे.” राहुल गांधी यांनी हे ट्वीट करत ईडीच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग देखील केलं आहे.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी शेतकरी, युवा, महिला, कामगार, लघु-उद्याोजक, दलित-आदिवासी, ओबीसींची तुलना अभिमन्यूशी केली. सहा जणांनी अभिमन्यूची हत्या केली. आताच्या आधुनिक चक्रव्यूहात आधुनिक अभिमन्यूंना अडकवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उद्याोगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी या सहा जणांनी हा आधुनिक चक्रव्यूह रचल्याचा आरोप गांधी यांनी केला. या लोकसभेतच ‘इंडिया’ आघाडी हमीभावाचा कायदा आणि जातगणना संमत करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मध्यमवर्गही भाजपपासून दूर जात असल्याचा दावा गांधी ( Rahul Gandhi ) यांनी केला.
काय पोस्ट केली आहे?
“दोघांपैकी एकाला माझं चक्रव्यूह संदर्भ देऊन केलेलं भाषण आवडलं नाही. ईडीतल्या आतल्या गटाने मला सांगितलं की तुमच्यावर आता छापेमारी केली जाणार आहे. त्यासंदर्भात योजना तयार केली जात आहे. मी तयार आहे, ईडीची वाट पाहतो आहे. चहा आणि बिस्किटं माझ्याकडून.” अशी सूचक पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.
२९ जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलत असताना राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) चक्रव्युहाचा संदर्भ दिला होता. एवढंच नाही तर सध्याचं चक्रव्यूह हे कमळाच्या आकाराचं आहे, ते चक्रव्यूहही त्याच आकाराचं होतं. आजच्या चक्रव्यूहात सहा लोक आहेत. त्यावेळी सहा लोक होते. तसेच आजही आहे. त्यात मोदी, शाह, संघ प्रमुख मोहन भागवत, डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत. हे सर्व काही कंट्रोल करत आहेत. असं राहुल गांधी म्हणाले होते. आता राहुल गांधींनी त्यांच्यावर ईडीची छापेमारी होणार आहे अशी पोस्ट केली आहे.