पुणे,दि 12 ः
एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आळंदी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले 2021-२२ पास आऊट झालेल्या २५० विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी चूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून झाली आहे.
या विद्यार्थ्यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मात्र स्थापत्य अभियांत्रिकीचे दिले गेले आहे या विद्यापीठाच्या गजब कारभारामुळे विद्यार्थी पालक त्रस्त आणि संभ्रमात पडले आहेत,अभविप पिंपरी चिंचवडच्या वतीने या प्रश्नाला वाचा फोडली आहे एमआयटी महाविद्यालयातील प्राचार्यांची भेट देऊन चर्चा करण्यात आली चर्चा केल्यानंतर असं दिसून येते की त्यामध्ये महाविद्यालयाची
कोणत्याही प्रकारची चूक नाही या प्रकरणात पूर्णपणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन जबाबदार आहे या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र दुरुस्त करून येत्या ४ दिवसात देण्यात यावं विद्यार्थ्यांकडून या पदवी प्रमाणपत्राची कोणतेही शुल्क घेऊ नये तसेच या चुकीला कोण जबाबदार आहे त्याची चौकशी करावी अशी मागणी अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशसहमंत्री आनंद भुसनर यांनी केली.