परभणी / प्रतिनिधी – येथील धार रोडवर स्थित नॅशनल कॅमप्स मध्ये आझाद एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी द्वारा संचलित नॅशनल उर्दू हाय स्कुल, ची शैक्षणिक सहल दिनांक 24 डिसेंबर 2024 मंगलवार रोजी वृंदावन उद्यान, चाकुर जि. लातुर येथे मुलां मुलींचे वेगवेगळी एस.टी. बस मध्ये जाउन आली.
यावेळी विद्यार्थ्यांसमवेत आयेशा कौसर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. व तसेच संस्था सचिव, मा. अली शाह खान, अध्यक्ष मा. इमरान अली शाह खान, कोषाध्याक्षा, श्रीमती नसीम अख्तर, यांनी ट्रिपसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य वातावरणात मिकी माउस, नवनवीन पाळणे व वेगवेगळे खेळ, संगीत कारंजा, स्कय बेल्ट, वाटर पार्क आणि बोट या सर्वांचा मनसोक्त आनंद लुटला. संध्याकाळी ठरलेल्या वेळी सहल शाळेवर सुखरूप पोहचली.