भोसरी, प्रतिनिधी – येथील रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी व भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये दिनांक १ ते ३ डिसेंबर २०२१ रोजी पाचवी “प्रकाश व्याख्यानमाला” नुकतीच पार पडली. या व्याख्यानमालेचा समारोप प्रसंगी प्रमुख व्याख्याते श्रीमती रुचिरा सुराणा यांनी तृतीय पुष्प गुंफताना “स्वप्नातून सत्याकडे” या विषयावर बोलताना स्वप्नातून सत्याकडे जाताना प्रयत्नांची आवश्यकता असते. स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सकारात्मक विचार व अनुभवी शिक्षण महत्त्वाचे आहे. तरच यश प्राप्त होते. दुसऱ्याने कितीही टीका केली तरी त्यापासून विचलित न होता प्रामाणिक प्रयत्न हेच स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी रामबाण उपाय आहे यासाठी अंतराळवीर कल्पना चावला यांचे ज्वलंत उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवले.
याप्रसंगी प्रास्ताविकपर मनोगतातून लताताई पगारिया यांनी आमच्या जडणघडणीमध्ये सासुबाईचा मोठा वाटा आहे; परिस्थिती कशी असली तरी तिला सामोरे जाण्याचे बाळकडू त्यांनी दिल्यामुळे आज आम्ही हे दिवस पाहत आहोत. आमचे भाऊजी स्वर्गीय प्रकाश पगारिया हे अतिशय हुशार व बुद्धिमान होते. ते सर्वांशी हसून खेळून वागायचे. आमच्याकडून एखादे काम हाताने करून घ्यायचे. एकत्र राहणे त्यांना खूप आवडायचे. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
रोटरी क्लब ऑफ भोसरी शाखेचे रो. रामदास जैद यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मा.संदीप साकोरे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक व अभिनेते यांच्या “आम्हीबी घडलो…तुम्हीबी घडा” या विषयावर व्याख्यान झाले. घडण ही क्रिया आंतरिक असली तरी आंतरिक शक्ती व बाह्य परिस्थिती यांचा समन्वय साधल्यास माणूस घडतो असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात शिवव्याख्याते व काँनक्वेस्ट कॉलेजचे प्राचार्य प्रदीप कदम यांनी दुसऱ्याचे जीवन प्रकाशमान करणे, विचार देणे, विचारातून माणसंजोडणं म्हणजे प्रकाश व्याख्यानमाला होय असे मत व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ अशोककुमार पगारिया यांनी संदीप साकोरे यांच्या बद्दल माहिती सांगून बंधु प्रा. प्रकाश पगारिया यांची स्मृती कायम राहावी ,त्यांच्या कार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबर विद्यार्थ्याचे प्रबोधन व्हावे ह्या उद्देश्याने ही व्याख्यानमाला महाविद्यालयाने सुरु केल्याचे सांगितले.
या व्याख्यानमाले प्रसंगी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी शाखेचे संचालक रो. विलासकुमार पगारीया,रो.ज्ञानेश्वर विधाटे, रो.शांताराम जाधव, उपस्थित होते
प्रा. विभा ब्राह्मणकर यांनी सूत्रसंचालन केले व सौ. सविता शेठिया रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक महिला शाखेच्या संचालिका यांनी आभार मानले.
सदर व्याख्यानमला यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे, मुख्य संयोजक प्रा.पांडुरंग भास्कर, प्रा. डॉ.विजय निकम, प्रा.प्रशांत रोकडे, प्रा.उमेश लांडगे, प्रा. डॉ.स्वाती वाघ, प्रा.सुधाकर बैसाने, प्रा.महालक्ष्मी ठुबे, प्रा.सचिन पवार, प्रा.रूपाली आगळे व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी एकता महिंद्रकार व रूपाली मोठे यांनी सहकार्य केले.