सेलू / नारायण पाटील – येथील भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते प्रसाद खारकर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी २४ फेब्रुवारी रोजी एक नियुक्ती पत्र काढून, येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत असणारे प्रसाद माधवराव खारकर यांची भारतीय जनता पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नियुक्ती पत्र प्रदान करताना सेलू जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे, जिल्हा सरचिटणीस सुभाष आंबट, अर्जुन बोरूळ, तालुका अध्यक्ष दत्तराव कदम, शहर अध्यक्ष अशोक अंभोरे, महानगर जिल्हा सरचिटणीस ऋतुजा जोशी, विठ्ठल कोकर, आनंद बनसोडे, विधानसभा विस्तारक सचिन लखमले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसाद खारकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेलू शहराच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली असून ,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ते मुख्यमंत्री मीत्र म्हणून, पक्षासाठी अविरत कार्यरत होते .त्यांचे भारतीय जनता पार्टी वरील निष्ठा व शहरातील कार्य पाहून ,पार्टीने त्यांच्यावर नवीन ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे .त्यामुळे त्यांचे तालुक्यातून सर्व स्तरातून स्वागत होत आहे.