परभणी,दि 21 ः
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अमोल जाधव यांची युवक काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवकांचे संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने अमोल जाधव यांच्यावर सोपवलेली जबाबदारी महत्वपूर्ण आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री उदयभानू चिब व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी नवीन नियुक्त्यांची यादी नुकतीच जाहीर केली.
अमोल नारायण जाधव हे गेल्या १2 वर्षांपासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून कार्यरत आहेत. तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव, म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे पाहून त्यांच्यावर आता परभणी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अमोल जाधव हे माजी मंत्री आमदार सुरेशराव वरपुडकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करत अमोल जाधव म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसारच आजवर कार्य केले आहे. मा. सुरेशराव वरपुडकर,माजी खा. तुकारामजी रेंगे पाटील आणि सुरेशदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यात युवक काँग्रेस जोमाने काम करणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देवून युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा गावखेड्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न राहील.”
या निवडी बद्दल शहराध्यक्ष नदी इनामदार माजी उपमहापौर भगवानजी वाघमारे प्रवक्ते सुहास पंडित, श्रीधर देशमुख, बाळासाहेब रेंगे,बाळासाहेब देशमुख,दिगंबर खरवडे, शेख खाजा, मिन्हाज कादारी,विनोद कदम, मोईन मौली,पवन निकम, नागसेन भेरजे, राजेश रेंगे, श्रीराम जाधव,प्रदीप सोनटक्के शिवाजी भालेराव,दिलावर शेख,जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी या निवडीचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या