परभणी,दि 06 ः
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे,उपजिल्हाधिकारी निवडणूक जनार्दन विधाते जिल्हा स्विप नोडल अधिकारी प्रा.गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय स्वीप सदस्यानी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयात (दि.6) एप्रिल रोजी मतदान जनजागृती संदर्भात मतदार दूत असलेल्या 11 वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एन. एन. राऊत तर मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ, स्वीप सदस्य बबन आव्हाड,महेश शेवाळकर,महेश देशमुख,अतुल सामाले,हनुमंत हंबिर,त्र्यंबक वडसकर,रामप्रसाद अवचार आदिंची उपस्थिती होती.यावेळी महेश देशमुख यांनी 26 एप्रिल को आना पड़ेगा..वादा सबको निभाना पडेगा..पोलिंग बूथ पर जाना पड़ेगा…उंगली उपर उठाना पडेगा ..शाई उसपर लगाना पडेगा..करलो सब तुम यार.. है मतदान.. मतदान.. या गितातून मतदानाचे महत्त्व पटवून देत असताना विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त या गीतावर ठेका धरला. तसेच आम्ही गड्या सुजान मतदार , मतदान नक्कीच करणार.. या गीतातुन एक मतांची किंमत पटवून दिली. प्रास्ताविकातून महेश शेवाळकर यांनी विद्यार्थ्याने मतदार दूत बनून आपल्या आई-वडिलांसह नातेवाईकांना 26 एप्रिल ला मतदान करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. याप्रसंगी अतुल सामाले यांनी विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ दिली. सूत्रसंचालन बबन आव्हाड तर आभार विभागप्रमुख प्रा.एस. एस. ढवळे यांनी मानले.