परभणी,दि 29 ः
प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने दोन दिवसीय मोफत दंत रोग तपासणी शिबिरात 81 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
दोन दिवसीय मोफत दंत रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी 39 रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घेऊन आपले उपचार केले व काही रुग्णांनी वेडे वाकडे दात सरळ करण्यास नाव नोंदवले व सवलतीच्या दराचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशी तब्बल 42 रुग्णांनी मोफत रोग निदानचा लाभ घेऊन दाताच्या पिन साठी काही लोकांनी नाव नोंदणी केली आहे. या दोन दिवसीय शिबिरामध्ये एकूण 81 रुग्णांनी लाभ घेतला आहे.सर्व पेशंट यांनी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव व संपूर्ण संस्थेचे अभिनंदन केले व डॉक्टरांचे खूप धन्यवाद आणि अभिनंदन केले .
शिबिर यशस्वी करण्यासाठी ब्रिजमोहनजी शोभा रामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चे संस्थापक अध्यक्ष गोविंद ब्रिजामोहनजी शर्मा, सचिव पवन शर्मा, उपाध्यक्ष शिवांगी गोविंद शर्मा, कोषाध्यक्ष आशिष तोंडगावकर सहसचिव कैलास शर्मा
सदस्य डॉ.राहुल आंबेगावकर व सारिका तोंडगावकर यांनी योगदान दिले व डॉ मीनल जेथलिया यांनी रुग्णांची तपासणी केली.