मुंबई – भाजपच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा भाषण केले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, असा कौल दिला आहे, असे म्हटले.
गटनेतेपदाच्या अनुमोदनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील सभागृहात उपस्थितांना संबोधित करत मतदारांचे आभार मानले. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर फडणवीसांनी जाणीवपूर्वक प्रकाश टाकत आमदारांचं लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी केंद्रीय निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्याप्रती आभार व्यक्त करत उपस्थित सर्व आमदारांप्रतीही आभार व्यक्त केले.
आपण एकमताने गटनेता म्हणून माझी निवड केली. त्याबद्दल आभार. या निवड प्रक्रियेसाठी आलेले रुपानी आणि सीतारामण यांचं मनापासून आभार मानतो. यावेळची निवडणूक ही अतिशय ऐतिहासिक होती. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी म्हणेल या निवडणुकीने एक गोष्ट ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है. मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्राने जो कौल दिला आहे. खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो,. असा कौल दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदेंबाबत फडणवीस म्हणाले…
‘या संपूर्ण प्रक्रियेत आपल्यासोबत तन-मनानं असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मी मनापासून आभार मानतो. रामदास आठवले आणि मित्रपक्षांचेही आभार, हे वर्ष अतिशय महत्त्वाचं असून, आपण ज्या प्रक्रियेतून निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली या संविधानाची 75 वर्षे पूर्ण होत असून, सर्वार्थानं हे वर्ष महत्त्वाचं आहे’, असं फडणवीस म्हणाले.