लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन,कार्यालयास लावले कुलुप

परभणी,दि 14 ः
अमडापूर येथील लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याने 2023- 24 गाळप हंगामातील थकीत रक्कम अदा करावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा महामंत्री विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी  कारखाना कार्यालयावर ठिया आंदोलन करत कार्यालयास कुलुप लावले.

लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याने 2023 24 4 गाळप हंगामातील उसाला रुपये 2700 भाव देतो म्हणून शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिलेले आहे, परंतु कारखान्याने प्रति टन 2500 रुपये दिले असून थकीत एफ आर पी पोटी चे रुपये दोनशे रुपये प्रति टन अद्याप न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी दिनांक 10ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक नांदेड यांना निवेदन देऊन चार दिवसात थकीत रक्कम अदा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती, परंतु थकीत रक्कम शेतकऱ्यांना कारखान्याने न दिल्यामुळे सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून शेतकऱ्यांनी श्री.बाबर यांच्या नेतृवात  कारखाना कार्यालयावर  येऊन ठिया आंदोलन सुरु केले. जोपर्यंत थकीत दोनशे रुपये प्रति टनाचे कारखाना देणार नाही तोपर्यंत कारखान्याचे कार्यालय सुरु करुन देणार नाही  असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.अखेर दुपारी चार वाजता बाबर यांनी कार्यालयास कुलुप लावत आंदोलन तिव्र केले.सायंकाळी उशीरापर्यंत आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने मंगळवारी देखील मोठ्या संख्येने शेतकरी कारखाना परिसरात आंदोलन करणार असल्याचे बाबर यांनी सांगीतले. या आंदोलनात सिंगणापूर,आमडापुर,इटलापुर,तट्टु जवळा,सहज जवळा, सायळा, सूरपिंपरी, बोरवंड, पांगरी, पोखर्णी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Comments (0)
Add Comment