परभणी,दि 28 ः
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती निर्मलाकाकी उत्तमराव विटेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मोठे शक्तीप्रदर्शन करत दाखल केला.संपूर्ण बाजार समितीचा परिसर,प्रमुख रस्त्यावर जिकडे तिकडे महायुतीचे कार्यकर्ते,सामान्य नागरीक,युवक यांनी भरुन गेले होते.ऐतिहासीक रॅलीने पाथरी दणाणून गेली होती.ही जनता संपूर्ण भाऊंच्या परिवारावर प्रेम करणारी होती.
संपूर्ण राज्याचे लक्ष पाथरी विधानसभेकडे लागले आहे, या मतदारसंघात तुल्यबळ लढती होत आहेत. या मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निर्मलाकाकी विटेकर यांना उमेदवारी मिळाली आहे,आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री असलेल्या निर्मलाकाकी यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. या मतदारसंघात येत असलेल्या सोनपेठ, पाथरी, मानवत या तीन तालुक्यावर विटेकर परिवाराचा मोठा प्रभाव असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच आबालवृध्दासह तरुणांनी मोठी गर्दी केली. पाथरी शहरात सकाळपासूनच सोनपेठ मानवत या भागातून तसेच पाथरीच्या ग्रामीण भागातून हजारो संख्येने कार्यकर्ते नागरिक येत होते. बाजार समितीचे मैदान तासाभरातच भरून गेले. तेवढेच कार्यकर्ते बाहेर देखील होते. सभेच्या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आमदार राजेश विटेकर,शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने ,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री विलास बाबर आदींनी मार्गदर्शन केले यावेळी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते,माजी महापौर प्रताप देशमुख,चंद्रकांत राठोड,डॉ.अंकुश लाड,श्रीकांत विटेकर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते,नंदाताई राठोड, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ,सिध्दांत हाके आदींची उपस्थिती होती. यावेळी महायुतीची एकजूट दाखवत सर्वांनी विजयाचा निर्धार केला.
सभा संपल्यानंतर शक्ती प्रदर्शन करत रॅलीला प्रारंभ झाला. बाजार समिती ते तहसील कार्यालय हा संपूर्ण रस्ता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यापून गेला. तहसील कार्यालयात उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला.
भाऊंच्या आठवणीत दादांचे डोळे पाणावले
स्व.माजी आमदार उत्तमराव भाऊ विटेकर यांचा बालेकिल्ला असलेल्या जुन्या सिंगनापुर मतदार संघातील अनेक जुने जेष्ठ सहकारी आज सभेला उपस्थित होते.वाटेत ठिकठिकाणी देखील विटेकर परिवारावर प्रेम करणारे नागरीक स्वागतासाठी उभे होते.यावेळी लोक भरभरून बोलत होते. आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही देत होते.हे पाहुन आ.राजेशदादांना गहिवरुन आले.भाऊंवर प्रेम करणारी एवढी जनता पाहुन उपस्थित सर्वच स्तब्थ झाले.
पाथरी विधानसभा मतदारसंघातील माय-बाप जनतेने आमच्या विटेकर कुटुंबावर कायम प्रेम केलं आहे. वेळोवेळी साथ आणि सोबत दिली आहे. त्यामुळेच आई-वडील आणि मला राजकीय क्षेत्रात स्थिरावता आले. त्याच विश्वासाने आजही जनता सोबत आहे. म्हणून पाथरी विधानसभेच्या परिवर्तनाची ही लढाई नक्कीचं यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे-
….आ.राजेश विटेकर….