परभणी : भारतीय संस्कृतीमध्ये लोककलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे विद्यार्थ्यांनी या लोककलेचा चिकित्सकवृतीने अभ्यास करून भारतीय संस्कृतीच वैभव सांगणाऱ्या लोककलेची जोपासना करावी असे प्रतिपादनअस्ट्रॉनोमीकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले.
बालरंगभूमी परिषद परभणी अंतर्गत जिल्हा शाखा परभणी च्या वतीने आयोजित लोककला प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरंगभूमी परिषद परभणीचे अध्यक्ष आबा ढोले प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट, डॉ अर्चना चिक्षे, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी, गोंधळमहर्षी गुलाबराव कदम, शिवाजी सूक्ते, रुक्मिणीबाई कदम गोंधळी, वाडेकर वासुदेव सचिन सरदेशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नितीन लोहट यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालरंग भूमी परिषद विविध स्पर्धा आणि महोत्सवाचे आयोजन करणार आहे.
याप्रसंगी वासुदेव , गोंधळी, वाघ्या मुरळी, गारुडी, लावणी, गवळण, भारुड, शाहीर आदी कलाप्रकार तर ढोलकी, संबळ, हलगी, डफ, मृदंग, लोकवाद्यांची माहिती देऊन सादरीकरण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी या लोककलेच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी परिषदेचे प्रमोद बल्लाळ, प्रकाश बारबिंड, सचिन आढे, अभिजित सराफ, रवी पुराणिक, राजू वाघ, दिनकर देशपांडे, प्रमोद जहागीरदार, श्रीकांत कुलकर्णी, केशव लगड, सायली शिंदे ,चेतना गोरशेटे, श्रीकांत मानोलीकर, वैजनाथ उमरीकर, संतोष कुलकर्णी, रेवती पांडे, अनंत जोशी, आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन त्र्यंबक वडसकर यांनी केले तर प्रकाश बारबिंड यांनी आभार मानले.
भारताचं भविष्य तुमच्या हाती.. जेष्ठ विधिज्ञ अशोक सोनी
अशा लोककला कार्यक्रमाच्या माध्यमातून
संस्कृतीचं जतन होतं. हे संस्कार तुमच्यावर झाले म्हणजेच लोककला संवर्धन नक्कीच होईल. तुम्ही ती निश्चितच टिकवून ठेवाल कारण भारताचं भविष्य तुमच्या हातात आहे. असे प्रतिपादन जेष्ठ विधिज्ञ अशोक सोनी यांनी केले. लोककला प्रशिक्षण कार्यक्रमात समारोप प्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना बालरंगभूमी च्या वतीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या लोककलावंतांनी केले मार्गदर्शन व सादरीकरण …
लोककला म्हणजे काय आणि त्याबद्दल अगदी सुटसुटीत मार्गदर्शन केले ते डॉ. अर्चना चिक्षे,
रामदास कदम गोंधळी यांनी. यांच्या समवेत , सुभाष पांचाळ, बालाजी वाडेकर वासुदेव , दत्ता वाडेकर, विजया कातकडे, शाहीर विश्वनाथ झोडपे आणि ग्रुप, अश्विनी नांदे आणि ग्रुप, नमिता पवार आणि ग्रुप, राजाभाऊ चव्हाण, श्रीया लव्हेकर, सई चिटणीस व इतर लोककलावंत यांनी सादरीकरण केले.
या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांनी कलेचा मनसोक्त आनंद लुटला सहा तास चाललेल्या सोहळ्यात विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.