मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी बाजार समितीच्या सचिव व अकाऊंटंट च्या दालनाला लावले न प ने सील

सेलू / प्रतिनिधी – येथील बाजार समितीकडे असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी नगर परिषदेने सचिव व अकाऊंटंट यांच्या दालनाला नगर परिषदेच्या वतीने आज सील लावण्यात आले आहे .यावेळी उपमुख्याधिकारी बी एस चव्हाण ,कर प्रशासक मुस्तजाब खान,उमाकांत बेंदरे, सोमेश्वर भुलंगे,चोबी आदींची उपस्थिती होती.

 

सेलू नगर परिषदेची येथील बाजार समिती कडे १९९८/९९ पासूनची मालमत्ता कराची थकबाकी ७६,०१ ,६३८ रुपये आहे .याबाबत वारंवार मागणी करून देखील बाजार समितीने या थकबाकीची रक्कम जमा न केल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे .याबाबत काल संबंधित अधिकाऱ्याची बैठक झाली व त्यामध्ये दि १५/१०/२४ रोजी थकबाकीचा चेक देण्याचे ठरले होते .परंतु याबाबत कसलीही कार्यवाही झाली नाही व सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे दि १५/१०/२४ मंगळवार रोजी दुपारी नगर परिषदेच्या वतीने बाजार समितीच्या सचिव व अकाऊंटंट यांच्या दालनास सील करण्यात आल्याची माहिती उपमुख्याधिकारी बी एस चव्हाण यांनी दिली आहे.

Comments (0)
Add Comment