38 व्या नॅशनल गेम्ससाठी डॉ. माधव शेजुळ, गणेश माळवे ,संजय भूमकर यांची निवड

सेलू (प्रतिनिधी )
खेल मंञालय व भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन व उत्तराखंड राज्य सरकार वतीने 38 वी ‌ नॅशनल गेम्स डेहराडून (उत्तराखंड) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व राज्य क्रीडा संघटनेच्या वतीने ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. डॉ. माधव शेजुळ, तर टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून गणेश माळवे, नूतन विद्यालय सेलू तर तलवारबाजी क्रीडा स्पर्धे साठी तांत्रिक समिती सदस्य म्हणून संजय भूमकर यांची निवड झाली आहे.
प्रा.डॉ. माधव शेजुळ , ज्ञानपोसक महाविद्यालय परभणी येथे कार्यरत आहे. यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त असुन त्यांनी ॲथलेटिक्स संघटनेच्या कोषाध्यक्ष पद भुषविले आहे. विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
गणेश माळवे , क्रीडा शिक्षक नूतन विद्यालय सेलू येथे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य,व परभणी जिल्हा सचिव म्हणून काम पाहत आहेत.
संजय भुमकर, क्रीडा शिक्षक, नूतन विद्यालय सेलू येथे कार्यरत आहेत. एन.आय.एस तलवारबाजी प्रशिक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.
परभणी जिल्ह्यातील तिघांची निवडी बद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सरचिटणीस नामदेव शिरगावकर, सहसचिव प्रकाश तुळपुळे ,ॲथलेटिक्स संघटनेच्या सरचिटणीस सतिश उचिकर , टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रविण लुंकड,सरचिटणीस यतिन टिपण्णीस, तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ.उदय डोंगरे, डॉ गणेशराव दुधगावकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे डॉ.एस.एम.लोया, डी.के.देशपांडे, डॉ.व्ही.के. कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, रणजीत काकडे, पांडुरंग रणमाळ, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे रोहिदास मोगल, प्रशांत नाईक, विविध क्रीडा संघटना अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments (0)
Add Comment