सेलूत मोफत आरोग्य तपासणी, नाडी परिक्षण तसेच सर्व रोगनिदान शिबीर संपन्न

सेलू / नारायण पाटील – दि 22 मे बुधवार रोजी अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र महेश नगर आयोजीत एक दिवशीय अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरूपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक सद्गुरू प.पण.मोरेदादा चॅरिटेबल हाॅस्पीटल अॅड ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, नाडी परिक्षण तसेच सर्व रोगनिदान शिबीर दि.22 मे बुधवार रोजी संपन्न झाले.
या शिबीरात एकूण एक्यांशी रूग्नाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

या शिबीरात डाॅ.दिलीप पाटील व सौ डाॅ. शुभांगी गवूरकर तर सहायक रामा दुधारे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच रूग्नाची मोफत तपासणी केली.
तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारावर योग्य मार्गदर्शन व ईलाज जसे कि हृदयविकार, मधुमेह, सर्व प्रकारचे कॅन्सर, रकतदाब, पोटाचे विकार, सांध्याचे विकार, त्वचा, वात,महिलांचे विविध विकार, मुतखडा, मुळव्याध, कावीळ, लहाण मुलांचे विकार,मनोविकार ई.विकेरांचे निदान करण्यात आले असून या शिबीरात नाशिक येथील डाॅ.शुभांगी गवूरकर, व डाॅ. दिलीप पाटील हे उपस्थित होते.

 

दि 22 मे बुधवार रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर येथील केंद्रात सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत शहरातील व तालुक्यातील 81 गरजुनी या शिबीरात सहभाग घेतला. या वेळी शिवाजीराव हरकऱळ ,नागेश कुलकर्णी, सुनील नवले, संजय गव्हाडे, सुनील गायकवाड, अमोल बारस्कर, सुमित शर्मा, शैलेश बारस्कर, नामदेव हरकळ, उमेश झोके,गजानन लहाणे भारत आवटे,पांडूरंग आवचार, जायकु गोरे आदि सह सर्व महिला व पुरूष सेवेकरी यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी करण्यात आला

Comments (0)
Add Comment