मतदान करणाऱ्या मतदाराची मोफत तपासणी-डॉ जवळेकर यांचा अभिनव उपक्रम

सेलू( नारायण पाटील )
मतदार जागृती करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न राबवले जात असतांना या उपक्रमास पाठींबा म्हणून २६ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणाऱ्या व्यक्तीची दि २६ एप्रिल रोजी मोफत तपासणी करण्याचा निर्णय येथील लक्ष्मी नारायण रुग्णालयाचे डॉ किशोर जवळेकर व डॉ सौ अनुपमा जवळेकर यांनी घेतला आहे .यादिवशी मतदान करून बोटाला शाई लावून आलेल्या प्रत्येक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे .
प्रत्येक मतदाराने मतदानासाठी मिळालेल्या सुट्टीचा उपयोग केवळ टूर साठी न करता आपल्याला मिळालेल्या मतदानाचा हक्क बजवावा व मतदानाची टक्केवारी वाढावी हाच यामागील उद्देश असल्याचे डॉ किशोर व डॉ अनुपमा जवळेकर यांनी स्पष्ट केले आहे .

Comments (0)
Add Comment