अश्वमेधतर्फे म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार

बाधितांनी लाभ घ्यावा असे डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांचे रुग्णांना आवाहन

 

निफाड, रामभाऊ आवारे – कोविड-१९ महामारी उपचारा दरम्यान काही रुग्णांमध्ये दिसून येणाऱ्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारावर अश्वमेध तर्फे कोपरगावकरांसाठी मोफत चिकित्सा व उपचार करण्याचा निर्णय अश्वमेध चे चेअरमन व प्रख्यात शास्त्रज्ञ तथा कीड रोग तज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे (कोपरगाव) यांनी घेतला असून अती रसायनांचा वापर झाल्यानंतर बुरशीजन्य आजार मनुष्य, प्राणी, वनस्पती यांच्यामध्ये दिसून येत असतो. आणि योग्य वेळी योग्य निदान या आजाराचे आयुर्वेदिक चिकित्सेद्वारे झाल्यास आजार बरा होऊ शकतो.असा विश्वास अश्वमेध वैद्य डॉ.अशोक गावित्रे यांना वाटतो. तरी अश्वमेधतर्फे म्युकरमायकोसिस वर मोफत उपचारांचा बाधितांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी केले आहे.

बुरशीरोधक क्षमता भारतीय वनस्पतींमध्ये यापूर्वीच आढळून आली आहे. आणि यापूर्वी पारंपारिक आजारांमध्ये अनेक वनस्पतींचा शास्त्रीय पद्धतीने वापर केल्याचे अनेक संशोधने प्रकाशीत झाले आहेत.

म्युकरमायकोसिस या बुरशीच्या वाढीसाठी डेक्स्ट्रोज, शुगर आणि वाढीव प्रथिने हे जवाबदार असतात. प्रयोगशाळेत अनेक बुरशीच्या वाढीसाठी यांचा वापर होत असतो. अगदी म्युकरमायकोसिस जास्तीत जास्त डायबिटिक रुग्णांमध्ये आढळून येतो अशी माहिती पुढे अली आहे तर कोविडमध्ये व्हायरस मुळे प्रोटीन सिंथेसिस मोठ्या प्रमाणात होते. आणि हेच सूत्र हा आजार कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो असे मत डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले म्युकरमायकॉसिसच्या उपचारासाठी अश्वमेध मेडिकेअरने यापूर्वीच काही उत्पादनांची नोंदणी केली आहे त्याचा उपयोग रुग्णांना या विकारामध्ये होईल अशी खात्री आहे.

मार्च २०१९ मध्ये कोविड-१९ वर खात्रीशीर उपचार आपल्याकडे असल्याचे यावेळी डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी प्रिंट मीडिया व सोशल मीडियाद्वारे रुग्णांना आव्हान केले होते व त्याचा फायदा आजपर्यंत लाखो रुग्णांना झाला आहे.

चीन मध्ये रुग्ण कमी होण्यामागील वनस्पती हि भारतातील वनस्पती अश्वमेधच्या ट्रीटमेंट मध्ये होती आणि चीनसह थायलंड, जापान, कोरिया तेथे रुग्ण कमी होण्यासाठी अश्वमेधच्या दाव्यातील वनस्पतींचाच उपयोग झाला आहे. तसेच स्थानिक आरोग्य विभाग, मुंबई विद्यापीठ आणि अश्वमेध चे संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-१९ वरील पेटंट अश्वमेधने यापूर्वीच पब्लिश केले आहे.अश्वमेध चे प्रोटेक कफेक्स हि कोविड ट्रीटमेंट मधील प्रमुख उत्पादने यूरोप, रशिया येथे देखील नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात असून त्याचा पुरवठा तिसऱ्या लाटे दरम्यान पाश्चात्य देशात लवकरच होईल.

म्युकर मायकोसिस ग्रेसीत कोपरगाव शहरातील जे रुग्ण असतील त्यांना या सेवेचा लाभ मोफत होणार आहे. गरजूंनी 02423 223557, व 7768004545 या संपर्क नंबर वर फोन करून माहिती घ्यावी.

म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार
Comments (0)
Add Comment