व्हाईस ऑफ मीडियाच्या सर्वोत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्काराने गजानन देशमुख सन्मानित

परभणी : व्हॉईस ऑफ मीडियाचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार परभणीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांना मिळाला आहे. बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य शिखर अधिवेशनात या पुरस्काराचे वितरण जिल्हाध्यक्ष देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बद्दल परभणी व्हॉईस ऑफ मीडियासह संपूर्ण संघटनेकडून आनंद व्यक्त करण्यात आला.

लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या देशातील ३८ हजार पत्रकारांची प्रथम क्रमांकाची संघटना असलेल्या व्हाईस आॅफ मीडियाच दोन दिवसीय शिखर अधिवेशन बारामती येथे दि.१८ व १९ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले. या अधिवेशनात सर्वोत्कृष्ट जिल्हाध्यक्ष हा पुरस्कार संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांना प्रदान करण्यात आला. बारामती येथील गदिमा सभागृहात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पद्मश्री पोपटराव पवार,गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील,व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय सरचिटनिस चंद्रमोहन पुप्पाला यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांना सन्मानीत करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट विभागीय अध्यक्ष हा पुरस्कार मराठवाडा विभागाचे अध्यक्ष विजय चोरडिया आणि विदर्भाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांना विभागून देण्यात आला. आपण दिलेली कौतुकाची ही थाप पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला बळ देणारी ठरेल. व्हॉईस आॅफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे,राष्ट्रीय कार्यालयीन सेक्रेटरी दिव्या भोसले पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया आणि परभणी व्हॉईस आॅफ मीडियाचे सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक मंडळी, सदस्य आणि सहकारी मित्र मंडळासह तमाम पत्रकार बांधवाचे देशमुख यांनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल मन:पूर्वक आभार मानले.

Comments (0)
Add Comment