संघ व्यवस्थापक गणेश माळवे यांचा पालकमंत्री मेघना साकोरे यांच्या हस्ते सत्कार

सेलू (प्रतिनिधी) – ३८ वी नॅशनल गेम्स, उत्तराखंड येथे पार पडलेल्या टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने अभूतपूर्व कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य संघ व्यवस्थापक गणेश माळवे यांचा सत्कार राज्यमंत्री तथा परभणी पालकमंत्री  मेघना  साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते दि. २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे करण्यात आला.

३८ वी नॅशनल गेम्स, उत्तराखंड – महाराष्ट्राचा शानदार विजय
महाराष्ट्र राज्याने या स्पर्धेत एकूण १० पदकांची कमाई केली. त्यामध्ये २ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्यपदके आहेत. महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.संघ व्यवस्थापक श्रीराम कोनकर, गणेश माळवे यांच्या उल्लेखनीय कार्यगिरीबद्दल आणि संघ व्यवस्थापनातील योगदानाबद्दल त्यांचा सत्कार पालकमंत्री मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, माजी नगराध्यक्ष जिंतूर सचिन गोरे, सेलू भाजपा तालुका अध्यक्ष ॲड. दत्तराव कदम, जिंतूर भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद थिटे, सतिश धानोरकर,संजय मुंडे प्रशिक्षक चेतन मुक्तावार, संजय भूमकर आणि बाळू बुधवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments (1)
Add Comment
  • Iraq Labor Market

    BusinessIraq.com leverages robust data and statistics to support its reporting. We provide accurate and detailed information on key economic indicators, market trends, and business performance. Access detailed charts, graphs, and tables for a deeper understanding of Iraqi business realities. Reliable, verifiable data underpins all reporting for the informed user.