परभणी,दि 04 ः
जिंतूर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन NDRF SDRF च्या निकषाप्रमाणे व तसेच झालेल्या नुकसानीस सरकट जोखीम हेक्टरी ५०,००० मदत द्यावी व तसेच जाचक आटी न लावता १०० टक्के जोखीम पिक विमा द्यावा अशी मागणी दुधगा महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी जिंतुर तहसिलदार व कृषि अधिकारी यांच्याकडे केली.
तसेच दुधगाव महसूल मंडळात करपराकाठच्या धानोरा देवगाव मुडा डोहरा रेपा बोर्डी कसर आसेगाव कौडगाव सोन्ना सह दुधगाव महसूल मंडळातील दुधगाव कौडगाव पं झरी कौडगाव प्र औंढा सोन्ना आसेगाव वस्सा आसेगाव लिंबाळा रेपा नागणगाव बोर्डी डोहरा मुडा देवगाव धानोरा माक शेक कोक करवली पिंपरी कसर सह ईतर जिंतूर तालुक्यातील गावात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या सह विविध मागण्यांबाबत निवेदन आज दिनांक ०४/०९/२०२४ बुधवार रोजी मा तहसीलदार जिंतूर तसेच मा कृषी अधिकारी साहेब जिंतूर यांना निवेदन देण्यात आले त्या ठिकाणी इरशाद पाशा चाँद पाशा, गंगाप्रसाद जाधव, सुनील कुटे, बालाजी घोळवे,राम देशमुख, शरद पारवे, आदेश पारवे, दिपक काष्टे, दत्तात्रय काटकर, बाळासाहेब देशमुख, आन्नु पाटील, सतीष देशमुख, योगीना घोरपडे, बाळासाहेब कऱ्हाळे आदी दुधगाव महसूल मंडळातील शेतकरी उपस्थित होते.