हिंगणघाट वर्धा,दि 05 (प्रतिनिधी :
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार रुपये प्रती एकरी मदत व ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्वभाप ची मागणी
आज दिनांक 5 आकटोंबर ला शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष हिंगणघाट तालुकाचे वतीने 1) अतिवृष्टीमुळे राज्यातील सर्व भागातील पिके सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग, ज्वारी, ऊस, फळबागा, भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, अती पाऊसाने शेतातील पिके काढता येत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेती वरील संकट अस्मानी आहे, त्यामुळे आपत्ती जाहीर करून आपत्ती व्यवस्थापन कायदाचा वापर करीत राज्यातील सर्व शेतक-यांना कोणतीही अट न ठेवता सरसकट 25 हजार रुपये प्रती एकरी मदत तातडीने जाहीर करून ती रक्कम शेतक-यांचे बँक खात्यात जमा करावी, 2) संपूर्ण राज्यात ” ओला दुष्काळ ” जाहीर करावा, या मागण्यांचे निवेदन मा. तहसिलदार हिंगणघाट यांचे मार्फत मा श्री उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री यांचे नांवाने दिले आहे. उद्योग, कारखाने आर्थिक संकटात सापडले तेव्हा तेव्हा सरकारनी वेगवेगळ्या योजनेतून मदत केली, त्याच प्रमाणे शेती हा “उघड्या आभाळा” खालील राज्यातील बहुसंख्य लोकांचा उद्योग आहे, तेव्हा शासनाने या शेती उद्योगाला त्याच धर्तीवर मदत जाहीर करावी. अशीही मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.
जर शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देतानी स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री मधुसूदन हरणे, बाबाराव दिवांजी, रमेशभाऊ बोबडे, साहेबराव येडे, संदीप ठाकरे, मोरेश्वर वाघमारे, अभिजीत लाखे, हेमराज ईखार, रोहीत हरणे, प्रकाश सेनाड, राजू नगराळे, सौ अर्चनाताई चेले सौ मंजूताई सिध्दवार ,अंकूश चेले, उमाकांत बेले, पुंडलिक हुडे, रमेश पाटील, कवडूजी शेळके, दशरथ धोटे, संदीप मुजबैले, मोहन बोरकर, पंकज साबळे, प्रविण भोयर, आशिष धोटे, नामदेव बावणकुले ,रोशन चौधरी, पियुष ठाकरे, अथर्व भोयर, प्रियांशू फरकाडे यश भेंडे,यांचे सह असंख्य कार्यकरते उपस्थित होते. मा तहसिलदार व नायब तहसीलदार कार्यालयात उपस्थित नसल्याने आस्थापना प्रमुखांना निवेदन देण्यात आले.