पाथरी,दि 06
मस्साजोगचे सरपंच स्व .संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवतत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या व इतर मागण्यांसाठी पाथरी तालुक्यातील मराठा बांधवांनी गुरुवारी सकाळी ११ वाजल्या पासून तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीयश लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी सहभाग घेतला आहे .
स्व . संतोष देशमुख यांच्या हत्येने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे . दोन दिवसांपुर्वी हत्येचे फोटो ,व्हिडीओ समाज माध्यमांवर वायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे . हत्येत सहभागी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीसाठी ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे . पाथरी तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने एकदिवशीय उपोषणाच्या आंदोलनाची हाक देण्यात आली होती . यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्र्यांना प्रशासनामार्फत निवेदन देण्यात आले होते . गुरुवार ६ मार्च रोजी सकाळी ११ वा .पाथरी तहसील कार्यालया समोर एकदिवशीय लाक्षणीक उपोषण शांततेत सुरू करण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी सहभाग घेतला होता . संतोष देशमुख हत्याप्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवा , आरोपींना फाशीची शिक्षा द्या , संतोष देशमुख अमर रहे , सातपुडा बंगल्यावर बैठक घेणाऱ्या नेत्याला सहआरोपी करा आदी घोषणा यावेळी देण्यात येत होत्या .
मस्साजोगले सरपंच स्व .संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा , मुंबईत सातपुडा शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी बैठक घेणार्या नेत्यासह आरोपीना मदत करणाऱ्या पोलिसांनाही पुरवणी आरोपत्रात सहआरोपी करा , सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या , या प्रमुख मागणीसाठी अखंड मराठा समाज पाथरी तालुक्याच्या वतीने गुरुवारी पाथरी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे .