नॅशनल हायवे ३६१ F मार्गावरील पडेगाव थांबा जवळचा सुमारे ७५ वर्षापुर्वीचा माझा जन्म.आजपर्यंत अगणीत वाटसरु,पशु व पक्ष्यांनी भर उन्हात अन पावसात माझाचं आश्रय घेतलाय.भर उन्हाच्या पार्यात कैक शेतकरी बाप- लेकरांनी माझ्याच सावलीत बसुन आपल्या शेतातुन पिकवलेल्या फळ-पिकांची विक्री करुन संसाराची गुजरान केली.माझे भारतीय संस्कृतीशी अतुट असे नातेसंबंध आहेत.तुमच्या अनेक अजारावर माझ्या सर्वच अवयवाचा औषधी म्हणुन तुमच्या जुन्या पिढ्या वापर करत आल्या आहेत.भारतीय आयुर्वेदातही मला अनन्यसाधरण असे महत्व आहे.तुम्हाला सत्यवान व सावित्रीची कथा माहित असेलच.सावित्रीनी माझीच पुजा करुन ब्रम्हदेवाकडुन सत्यवानाला जिवंत करुन त्याचे आयुष्य वाढुन घेतले होते.अन आजही याच दिवसाला स्त्रीया माझी पुजा करुन त्यांच्या पतीचे आयुष्यमान वाढुन घेण्यासाठी ब्रम्हदेवाकडे अराधना करत असतात.
ब्रम्हवृक्ष म्हनुनही माझा परिचय आहे.कदाचित तुम्ही विज्ञानवादी लोक देव धर्म यावर विश्वास ठेवणार नाहित.तुम्ही स्वत:ची प्रगती करतांना एवढे स्वार्थी बनलात की स्वत:शिवाय इतर जीवांच्या हिताचा कणभरही विचार करायला तुम्हाला उसंत नाही.अरे तुम्हाला आई पाहीजे,बहिण पाहिजे अन सुंदर बायकोपण. पण तुमच्या विज्ञानाच्या संशोधनातुन केलेल्या प्रगतीतुन तुम्हाला गर्भातच मुलगा कि मुलगी कळायला लागलय. मुलगी असेल तर त्या निरअपराध जीवाचा या जगात येण्यापुर्वीच तुम्ही लोक तीची कतल करत राहिलात.तुमच्या स्वार्थी विकासाच्या हव्यसापोटी तुमच्या लेकरांच्या कतली करणारे तुम्ही लोक,तुमच्या गुळगुळीत रसत्यापायी आमचा जीव वाचवण्याची अपेक्षा तुमच्याकडुन करणे गैरच,परळी गंगाखेड हायवेच्या तुमच्या रसत्याच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु झाले.जसा यमदेवाने एखाद्याच्या मरणाचा क्रमांक नोंद करावा अन त्याचा जीव जावा.अगदी त्याचप्रमाणे रसत्याच्या दुतर्फा असणार्या वृक्षांच्या कतली करण्यासाठी प्रत्येक वृक्षावर क्रमांक टाकुन वृक्षांच्या कतली सुरु झाल्या.तसा माझाही क्रमांक जवळ जवळ आलाच होता.आता माझी कतल होणार मी मरणार हे गणित फिकस् झाले होते.आजपर्यंत मी अनेक उन्हाळे,पावसाळे अन तर्हेतर्हेची माणसं पाहिली.भर उन्हात वैशाखाचा वणवा पेटला असताना कुणीतरी वाटसरु माझ्या सानिध्यात येतो विसावा घेतो.तेव्हा मला समाधान वाटते.आता माझे आयुष्यमान संपणार माझी मरणाची घटका जवळ आली होती.
खर तर! माझी अराधना करणार्या मातेच्या पतीचे आयुष्यमान मी वाढुन देणारा ब्रम्हाचा वृक्ष म्हणुन माझी ओळख आज मात्र माझंच मरण मला समोर दिसु लागलं.घरघर घरघर असा कतलीचा आवाज कानी घुमु लागला.माझ्यासारखा एक पूर्ण वाढ झालेला वडाचा वृक्ष एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू देतो.तुमच्या भाषेत ऑक्सिजन, तुम्हाला…एवढा प्राणवायु देणारा वटवृक्ष तुमचा राष्ट्रीय वृक्ष असुनही मला जीवंत ठेवण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही तजवीज रस्ता रुंदीकरण करतांना शासनस्तरावरुन केल्या जात नाही.हे राष्ट्रीय वृक्ष म्हणुन माझं दुर्देवच म्हणावं लागेल.कोरोना सारख्या महा अजाराने प्राणवायुचे महत्व तुम्हाला कळुन सुद्धा आमचे तुमच्या जीवनातील महत्व न जानणारी तुमची भस्मासुरांची औलाद तुम्हाला एकदिवस भस्म करुन टाकल्याशिवाय राहणार नाही.
याच रसत्यावरुन मंत्री,खासदार,आमदार,भांडवलदार,अॅक्टर ,डाॅक्टर जे स्वत:ला उच्चभ्रु समजतात यांच्यापासुन भिकार्या पर्यत कितीतरी जनांनी ये-जा केली.पण आमच्या मरण कळा कोणालाच समजुन आल्या नाहीत.
अचानक सकाळी सकाळी आजुबाजुला घरघर होणार्या कतलीचा आवाज बघुन माझं ही मरण मी मरण्याआधीच निपचीत पडुन जणु देऊन टाकलं होतं ,एवढ्यात कोणीतरी मला घट्ट मिठ्ठी मारली.मला काही क्षण वाटलं माझा आता मरणाचा अंतिम क्षण आला.यमाने मला घेऊन जाण्यासाठी मिट्टी मारली.पण त्या मिट्टीत पराकोटीचा कारुण्य भाव,प्रचंड सहिष्णुता,स्नेह प्रेम,सहृदयता होती.अंगी प्रंचंड तेज होते.जणु ब्रम्हदेवाचा खरा अंशच म्हणावा लागेल.तो कडाडला “मी तुला मरु देणार नाही,बघु तुला कोण मारते ते”
.माझं मरण तर फिक्स झाले होते.ते आता ब्रम्हदेवाशिवाय कोणालाच थांबवता येणार नव्हतं हे मी चांगलेच जाणुन होतो.त्या माणसाला बघुन येणार्या जाणार्या लोकांची प्रचंड मोठी गर्दी जमली होती.लोक आपआपले स्मार्ट फोन काढुन त्या माणसांकडे सेल्फी फोटो काढण्यासाठी धावु लागले.तो माणुस मात्र या सर्वांवर लालेलाल झाला.खबरदार! कोणी माझा फोटो काढलात तर बघा!तुमची खैर नाही.त्या माणसाचा करारीपणा बघुन लोक जरा सबुरीनंच घ्यायला लागले.हा माणुस नक्किच कोणीतरी असामान्य माणुस मला वाटु लागला.त्याने आपला फोन काढुन कोणाशीतरी संवाद साधला. त्याच्या बोलण्यात विश्वास होता,पराकोटीची नम्रता होती.आमचे आयुष्यमान वाढवण्यासंदर्भातलं ते सगळं बोलणं होत होतं.
आमच्यावर कतलीचे जे क्रमांक टाकले होते.अगदी त्याच क्रमांकावर पुढच्या काही वेळेतच सह्याद्री देवराईचे बॅनर पडले.अन आमच्या कतली करणारे ते घरघर करणारे आवाज थांबले. काही क्षण का होईना आमचे मरण थांबल्या गेले.तुमच्या वैज्ञानिक प्रगतीतुन तयार झालेल्या काही साधनाच्या केमीकलच्या पावडरचा उपयोग करुन माझे कसलेतरी ऑपरेशन केल्या गेले मी अधु झालो.तब्बल एक वर्ष मी तसाच जाग्यावर होतो.पण काहि का असेना त्या देव मानसांने माझे मरण निश्चित टळवले होते.. वृक्ष मित्र श्यामसुंदर सोबत त्या देवमाणसाचे बोलणे झाले जसं जमेल तसं श्यामसुंदर माझी सुश्रुशा करत राहिला. माझ्या पुनरस्थापणेची जागा निश्चित करण्याची जबाबदारीही श्यामसुंदरवरच दिली.श्यामसुंदरने आमच्यासाठी योग्य अशी जागा निश्चित करण्यासाठी शोधाशोध केली.पिढ्यानपिढ्या ज्यांना मी खुप काहि दिले.दुर्देवाने अशा शेतकर्यांनी सुद्धा माझ्यासाठी जागा देण्यास टाळाटाळ केली.असो त्याबद्धल मी काही जास्त उहापोह करणार नाही.शेवटी माझी पुनरस्थापनेची जागा निश्चित झाली.अन तो देव माणुस कोसो दुरुवरुन यतो अन रखरखत्या भर उन्हात ४२’ अंशाच्या तापमानात दिवसभर राबराब राबुन तुमच्या वैज्ञानिक प्रगतीतुन तयार झालेल्या साधनांचा व केमिकलचा वापर करुन मला जशाच्या तसं दुसर्या जागी पुनरस्थापित करतो. मला जीवनदान देणारा तो देवमाणुस दुसरा तीसरा कोणी नसुन शेतकरी कुटुंबात जन्मलेला मराठमोळा सिनेअभिनेता ज्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषिक सिनेमात काम करुन आपल्या कौशल्याच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले असा रांगडा लाडका सुप्रसिद्ध सिनेअभिनेता सयाजी दादा शिंदे होय. हाच माझा देव दुपारच्या जेवनासाठी अलिशान हाॅटेलात न जाता, माझी वर्षभर सुश्रुशा करणार्या साध्याशेतकरी पुत्राच्या टेबल फॅनच्या घरात रखरखत्या उन्हात जाऊन ताटातला अन्नाचा एक कणही वाया न घालवता आनंदाने पोटभर जेवन करतो.आपल्या बडेजाव पणाचा कसलाही आव न आणताअगदी सहजतेने त्या कुटुंबात समरसुन जातो. पण गावातील व घरातील दिवसा लाईटचे दिवे जळतांना पाहुन श्यामसुंदरवर रागा भरणारा लालेलाल होणारा,
माझीच नाहितर देशातील सर्व संसाधनाची लेकराप्रमाणे काळजी घेणारा मला जीवनदान देणारा या पृथ्वीतलावावरील खरा खुरा देव माझा सयाजीच.
वृक्षमित्र श्यामसुंदर निरस
9822865393