विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी…

पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या जवळपास अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल- रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच २ जूनपासून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. याची माहितीअसल्याची माहिती विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने दिली आहे. आज (शनिवार) विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समितीच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या रुक्मिणी मंदिरात संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम सुरू असल्याने १५ मार्चपासून पदस्पर्श दर्शन बंद होते. आता आषाढी वारीच्या एक महिना आधी मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन १५ मार्च पासून बंद केले होते. याकाळात भाविकांना रोज सकाळी ५ ते ११ या कालावधीत मुख दर्शन घेता येत होते. तसेच मंदिराच्या बाहेर स्क्रीनवर विठुरायाच्या दर्शनाची सोय करण्यात आली होती.आता पुन्हा पदस्पर्श दर्शन सुविधा सुरू झाली आहे.

आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यातील सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या २ जूनपासून पदस्पर्श दर्शन पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.

मंदिराचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के कामे आषाढी वारी आधी पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता आषाढी वारीनिमित्त विठुरायाचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तसेच आषाढी यात्रेच्या निमित्ताने ७ जुलैपासून देवाचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.‌

१५ मार्च पासून देवाचे पदस्पर्श दर्शन बंद होते व १७ मार्च पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या कालावधीत देवाचे मुख दर्शन रोज पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत घेता येत होते. तसेच मंदिराचे बाहेर स्क्रीन लावून देवाचे दर्शनाची सुविधा होती. या कालावधीत वारकरी संप्रदायाच्या चैत्री वारीत म्हणजेच १५ ते २१ एप्रिल दरम्यान मुख दर्शन दिवसभर सुरु होते. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीवर दगड, वाळू अन्य काही उडू नये यासाठी बुलेटप्रुफ काच बसविण्यात येणार आहे.

Comments (0)
Add Comment