विवेकानंद विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

सेलू ( नारायण पाटील )
शहरातील भारतीय शिक्षण संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर ) अभिवादन करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून मु.अ. शंकर शितोळे तसेच विनोद मंडलिक ,प्रमुख वक्ते गजानन साळवे यांची उपस्थिती होती.
गजानन साळवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य व शैक्षणिक विचार यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.आभार विजय चौधरी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल कौसडीकर ,शंकर राऊत ,स्वप्नाली देवडे ,सोनाली जोशी ,अर्चना निळे यांनी प्रयत्न केले.

Comments (0)
Add Comment