परभणी,दि 01 ः
टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशन परभणी व सीपीई चॅप्टर परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत जीएसटी परभणी संघ विजेता ठरला आहे तर परभणी इंडियन्सने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या सत्यराज टर्फ इटको कंपाऊंड येथे दिनांक 26 व 27 एप्रिल रोजी ही स्पर्धा पार पडली.
परभणी जिल्ह्यातील कर सल्लागार, सीए, जीएसटी कार्यालय परभणीच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. दिनांक 26 एप्रिल रोजी जीएसटी सहाय्यक आयुक्त धनंजय देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत जी.एन. भंडारी, परभणी इंडियन्स, विकेट वॉरियर्स, सनरायझर्स परभणी, जीएसटी परभणी, इंडियन ब्लास्टर्स हे सहा संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत जीएसटी परभणी संघ विजेता ठरला असून परभणी इंडियन्सने द्वितीय पटकावला आहे.
पारितोषिक वितरण टॅक्स प्रॅक्टिसनेस असोसिएशनचे निलेश शर्मा, सीपीई चाप्टर चे रोहित मंत्री, कुशल गंगवाल, जीएसटी सहाय्यक आयुक्त धनंजय देशमुख, ए आय एफ टी पी चे सहसचिव एडवोकेट राजकुमार भांबरे, संतोष इंगळे, सीए श्याम धूत, सी ए अरुण ओझा, टॅक्स प्रॅक्टिसनेस असोसिएशनचे अध्यक्ष गोविंद भंडारी, सीए दशरथ भालके, सीए सचिन भोंब, संतोष कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गोपाल मुरक्या, हितेन तलरेजा, महेश कालानी, सत्येन गुंडलवार यांनी परिश्रम घेतले.
Good https://is.gd/N1ikS2