पूर्णा / प्रतिनिधी – तालुक्यातील मौजे कान्हेगांवात एका किराणादूकानदार गुटखा तस्करांच्या घरांवर पूर्णा पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता.३ रोजी भर दुपारी छापेमारी केली.सदर ठिकाणी पोलीसांना शासनाने प्रतिबंधितीत केलेला वेगवेगळ्या कंपनीचा सुमारे ६० हजार रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला आहे.या प्रकरणी पोलीसांनी गुटखा जप्त केला असून, एका विरोधात देखील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीसांनी पूर्णा शहरातील गुटखा माफी यांचे धाबे दणाणून सोडल्यानंतर माफीयांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळविला असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून माफीयांनी ग्रामीण भागातील तरुणांना गुटखा तस्करीच्या कामाला जुंपले आहे.यापुर्वीही ग्रामीण भागातील तस्करांना पोलीसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली होती. कान्हेगांवात एक किराणा दुकानदार आपल्या दुकानातुन गुटखा तस्करी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच सोमवारी ता.३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विलास घोबाडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि वडजे , जमादार रमेश मुजमुले, पोकाॅ.पांडुरंग वाघ ,पोकाॅ.खनपटे, मपोशी. पलमटे पथकातील आदींनी कान्हेगांव येथील विलास संभाजी पारटकर याच्या किराणा दुकानात झाडाझडती घेण्यासाठी गेले असता तो घटनास्थळावरुन पसार झाला पोलीसांनी त्यांचे दुकान तसेच बंद घरात तपासणी केली असता पोलिसांना २३ हजार ७१६ रुपये किंमतीचा राज निवास पानमसाला सुगंधी तंबाखूच्या समावेश असलेला गुटखा ,४ हजार १८५ रुपयांचा प्रिमीअर जर्दा ,३० हजार ५९४ रुपये किंमतीचा गोवा व विमल नामक गुटखाचे एकुण ५८ हजार ४९५ रुपये किंमतीचे गुटखा पुडे आढळून आले. पोलीसांनी घटनास्थळां वरून मुद्देमाल गुटखा ताब्यात घेऊन विलास पारटकर विरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात पो.काॅ.पांडुरंग वाघ यांच्या फिर्यादीवरून गुरनं ३४/२०२५ कलम १२३,२२३,२७४, २७५, ३(५)भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम ५९ अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनि नांदगावकर हे करत आहेत.