परभणी,दि 24 (प्रतिनिधी)ः
परभणी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकऱ्हाळा येथे येथे जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एच.ए.आर.सी) संस्थे मार्फत आनंदी पेटी वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी एच.ए.आर.सी संस्थे तर्फे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकऱ्हाळा येथे 114 पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धवराव गरुड तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पवन चांडक, बाल साहित्यिक श्री.मारुती डोईफोडे, उपाध्यक्ष जळबाजी राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाषराव गरुड, प्रकाशराव गरुड, मुख्याध्यापक नामदेव निलावार,अशोकराव येडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहम्मद हुसेन शेख यांनी केले.
एचएआरसी अध्यक्ष डॉ.पवन चांडक मनोगत व्यक्त करतांना म्हणाले,”ज्ञानाने समृद्ध होण्यासाठी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या संधीचा प्रत्येकाने फायदा करून घेऊन आपला विकास साधला पाहिजे.
7 जिल्ह्यातील 136 जि प शाळेला आनंदी वाचनपेटी भेट: होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या वतीने मटकऱ्हाळा येथे 136 वी आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आली असून आतापर्यंत नांदेड,लातूर,जालना, हिंगोली,परभणी,बीड व पुणे जिल्ह्यातील 136 शाळांना ही आनंदी वाचन पेटी लोकसहभागातून भेट देण्यात आल्याचे डॉ.चांडक यांनी सांगितले.वाचन पेटी मध्ये पुस्तकांचा खजिना असून यात कथा व कविता संग्रह, महापुरुषांची, शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध असून मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत. ताडकळस येथील केंद्रप्रमुख राम जाधव यांनी एच.ए.आर.सी संस्थेला डोनेशन दिले ज्यातून ही वाचन पेटी भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कैलास सुरवसे यांनी तर आभार भरत टोके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ प्राथमिक शिक्षक सय्यद रहमत, मुंजा कुंठे, सौ.स्वाती विभूते, स्नेहा ढगारे आदींनी अथक परिश्रम घेतले.
Good https://lc.cx/xjXBQT
Awesome https://lc.cx/xjXBQT
Good https://lc.cx/xjXBQT
Very good https://lc.cx/xjXBQT