सेलू,दि 18 ः
येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष हेमंतराव मुरलीधरराव आडळकर यांना नवी दिल्ली येथील प्रमोटिंग अचिव्हमेंट्स फाउंडेशनच्या प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट चेअरमन परफॉर्मन्स अवॉर्ड फॉर को-ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट विथ मेडल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलूच्या वतीने सत्कार करण्यात आला.
फाऊंडेशनचे सचिव डी. पी. सेमवाल यांनी एका पत्राद्वारे याबाबत त्यांना कळविले आहे. आठ एप्रिलला नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात संबंधित पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे. पुरस्काराबद्दल हेमंतराव आडळकर यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक दत्तात्रय आंधळे, ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष डाॅ विलास मोरे, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर, संघटक सुनील गायकवाड, शुकाचार्य शिंदे, सत्यनारायण ताठे, एड किशोर जवळेकर, उद्योजक प्रताप कांचन, कैलास कांचन, मुस्ताक रब्बानी, अब्दुल रफीक आदींची उपस्थिती होती.