सेलू / नारायण पाटील – महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे,संचलित स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू च्या वतीने पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन हिंदी मराठी ग्रंथालयात करण्यात आले होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ग्रंथालयाचे अध्यक्ष एम. आर. पटेल यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तसेच जेष्ठ साहित्यिक व पत्रकार आसाराम लोमटे यांची उपस्थिती होती .यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती साईबाबा बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर , प्रसिद्ध उद्योजक नंदकिशोर बाहेती , चेतन कुमार बाहेती , आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माणिक पुरी, विनायकराव कोठेकर आदींची उपस्थिती होती .
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
ग्रंथालयाचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रप्राप्ती नंतर चे उल्लेखनीय असलेल्या कार्याची ओळख प्रास्ताविकात ग्रंथालयाचे सचिव डॉ शरद कुलकर्णी यांनी करून दिली . तसेच या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला . हे ग्रंथालय म्हणजे केवळ वाचनापूरते नसून सामाजिक बांधीलकी ठेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कार्याची देखील नोंद घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान करते असेही त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले .
बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून पुरस्कार प्राप्त केल्या बद्दल हेमंतराव आड ळकर यांचा तसेच कोहिनुर रोप च्या माध्यमातून उदयोग क्षेत्रात पुरस्कार प्राप्त केलेले प्रसिद्ध उद्योजक नंदकिशोर बाहेती व चेतन कुमार बाहेती तसेच राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक माणिक पुरी यांचा ग्रंथालयाच्या वतीने तसेच निवृत्त सेवक संघाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी सत्काराला उत्तर देतांना सत्कार मूर्ती हेमंतराव आडळकर ,नंदकिशोर बाहेती,माणिक पुरी यांनी आपल्या आपल्या व्यवसायातील चढ उतार तसेच चांगले वाईट प्रसंग विषद केले .व या पुरस्कारामागे सर्वांचे आशीर्वाद व सेलूकरांचे प्रेम आहे .असे बोलून सन्मान केल्याबद्दल ग्रंथालयाचे आभार मानले .
आपले सेलूशी व या हिंदी मराठी ग्रंथालयाशी देखील भावनिक नाते आहे .समाजातील चांगुलपणा कमी होत आहे .हे सांगण्यापेक्षा तो कसा वाढवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे .ध्येयाने झपाटलेल्या व्यक्ती या आपल्या क्षेत्रात प्रगती करून समाजातील चांगुलपणा जपण्यासाठी प्रयत्न करत असतात हे निश्चितच भावी पिढीला आदर्शवत असेच कार्य आहे . व त्यामुळेच त्यांच्या कर्तृत्वाचा आज गौरव माझ्या हस्ते होत आहे. हे मी माझे भाग्यच समजतो असे विचार आसाराम लोमटे यांनी मनोगतात व्यक्त केले .अध्यक्षांच्या वतीने विनायकराव कोठेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत मोगल यांनी केले तर माधव गव्हाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले .
यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रतिष्ठित व्यक्तीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .