हिंगणघाट-वर्धा, प्रतिनिधी – माता मंदिर वॉर्ड परिसरात रस्त्याची अतिशय दुर्दश्या झाली आहे रस्त्याचा मधोमध पडलेल्या खड्डडयात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकरिता माता मंदिर वॉर्ड परिसरातील अनेक नागरिक ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांची भेट घेऊन यांना निवेदन दिले. आणि या निवेदनातून वॉर्डातील अनेक समस्या अमृत योजनेतून नाल्याचे निकृष्ट दर्जाचे कामे, रस्त्याची झालेली दुर्दरश्या, रोडच्या मधोमध पडलेले खड्डे, खड्यात साचलेले पाणी अशा अनेक समस्या अतुल वंदिले यांच्या पुढे मांडल्या याच समस्याचे निराकरण करण्यासाठी मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी न.पा.मुख्याधिकारी श्री अनिल जगताप यांच्याशी चर्चा केली असता आज माता मंदिर वॉर्ड परिसरात मुख्याधिकारी श्री अनिल जगताप, इंजिनियर तळवेकर साहेब यांनी वॉर्डात येऊन शहानिशा केली मनसे राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांनी स्वतः त्या वॉर्डातील समस्या लक्षात आणून दिल्या व त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली तसेच माता मंदिर वॉर्डातील अनेक समस्यांचे निराकरण तात्काळ मार्गी लावा असे अतुल वांदिले यांनी मुख्याधिकाऱ्याना यावेळी सांगितले.