उत्कर्ष विद्यालय व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात प्रेसिडेन्शियल परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

 

सेलू / प्रतिनिधी – येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय सेलू येथे प्रेसिडेन्शिअल परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस ऑरेंज कॅप व द्वितीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास येल्लो कॅप देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कैलास ताठे व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हरिभाऊ कांबळे तसेच पालक उपस्थित होते.

 

थोडक्यात या परीक्षेचे स्वरूप अशा प्रकारे होते की, इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयाच्या प्रत्येकी 50 गुणांची परीक्षा होती. यापैकी जो सर्वात जास्त गुण घेईल त्याला ऑरेंज कॅप ने सन्मानित करण्यात आले व जो द्वितीय क्रमांक घेईल त्याला येल्लो कॅप ने सन्मानित करण्यात आले. अशा या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

डॉ. संजय रोडगे यांनी मार्गदर्शन करते वेळेस सध्याचे शिक्षण व त्यामध्ये होत असलेला बदल सांगितला व काळानुसार आपणही बदलले पाहिजे असेही ते म्हणाले. मार्गदर्शना नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली मधून 1) शंभूराजे सुधाकर वाडेकर 2) शिवांश महेश लाटे इयत्ता दुसरी मधून 1) मोरे विराज इंद्रजित. 2) विराट अनंत पावडे इयत्ता तिसरी मधून 1) वेदिका विजय लहाने 2) कैवल्य अतुल रोडगे इयत्ता चौथी मधून 1) समर्थ अविनाश चव्हाण 2) सार्थक संचिन गव्हाणे. इयत्ता पाचवी मधून 1) वैष्णवी राजकुमार क्षीरसागर 2) आराध्या नागेश निलवर्ण इयत्ता सहावी मधून 1) तुनुश्री बाळाभाऊ डख 2) अनुष्का मंचक आचणे इयत्ता सातवी मधून 1) श्रेया अविनाश चव्हाण 2) अनिकेत बाबाराव गोरे ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयातून इयत्ता आठवी मधून 1) अंजली बाबासाहेब खेडेकर 2) साक्षी सचिन कांबळे इयत्ता नववी मधून 1)कृष्णा नारायण रासवे 2) सई विशाल सोनटक्के इयत्ता दहावी मधून 1) श्रावणी प्रभाकर सोळंके 2) बालाजी सुनील सूर्यवंशी या विद्यार्थ्यांना ऑरेंज कॅप व येल्लो कॅप मिळाल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप आकात यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. दिगंबर टाके यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उत्कर्ष विद्यालयातील व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Comments (0)
Add Comment