महिला दिनानिमित्त ऊसतोड कामगार महिलांचा सन्मान

पाथरी,दि 08 ः
संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त कानसुर वस्ती येथील ऊसतोड कामगार महिलांचा सन्मान करण्यात आला.

महिलांना गावातील ग्रामसेवक व सरपंच यांच्या हस्ते ऊसतोड कामगार ओळखपत्र वाटप करून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ विषयी माहिती देण्यात आली त्यामधील योजनांची माहिती सांगण्यात आली.
महामंडळ अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये ऊसतोड कामगार यांच्या मुलांना भगवान बाबा वसतिगृह चा लाभ, सानू ग्रह योजनेअंतर्गत असलेल्या योजना उदा. वैयक्तिक अपघात मृत्यू विमा, वैयक्तिक अपघात अपंगतत्व विमा, वैयक्तिक अपघात वैद्यकीय खर्च, बैल जोडी लहान मृत्यू योजना विषयी माहिती देऊन योजनाविषयीं जागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला गावचे सरपंच कुसुम हिवरकर मॅडम, गावचे ग्रामसेवक मा. आडसकर साहेब, पोलीस पाटील मा. गौतम घाघरमाळे, अंगणवाडी ताई सुरेखा साळवे, आरोग्य सेविका टोगराज मॅडम, आशा वर्कर शिंदे मॅडम, वैजनाथ कसबे, बबन कसबे व इतर गावातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये गावचे ग्रामसेवक यांनी महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊन महिलांनी बालविवाह कोठे होत असतील तर ते थांबवावे, गावातील कारभारात सहभागी व्हावे या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकल्प संस्थेचे समन्वयक बालासाहेब खोपे यांनी केले तर महिलांना मार्गदर्शन मा. विठ्ठल साळवे यांनी केले तर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ विषयी माहिती संकल्प संस्थेचे प्रकल्प समन्वयक सावन जोंधळे यांनी दिली.
संकल्प संस्थेच्या वतीने कार्यक्षेत्रातील बाबुलतार, बोरगव्हाण व गुंज गावात सुधा महिला दिन साजरा करून महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच संकल्प संस्थेच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत पाथरी येथे युवतीना ब्युटी पार्लर कोर्स शिकवण्यात येत आहे तिथे सुधा महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाण महिलांचा सहभाग होता.

Comments (0)
Add Comment