Corona Vaccine : कोरोना झाल्यानंतर किती महिन्यांनी घ्यावा लसीचा डोस, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली – कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. नागरिकांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोनाची लस घ्यायची असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी दिली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने सांगितले की संक्रमित आढळलेल्यांच्या लसीकरणात तीन महिन्यांचा विलंब होईल. त्यात ‘बूस्टर’ डोसचा देखील समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात, म्हटले आहे की, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना आता तीन महिन्यांनी बरे झाल्यानंतर डोस देण्यात येईल. यामध्ये बूस्टर डोसचा देखील समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याची दखल घेण्याची विनंती शील यांनी केली आहे.

केंद्राने या गाईडलाईन्समध्ये लिहिले की, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तीन महिन्यांनंतर कोरोनाविरोधी लस मिळेल. यात ‘बूस्टर’ डोसचाही समावेश आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी म्हटले की, “कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना आता तीन महिन्यांनी बरे झाल्यानंतर लसीचा डोस देण्यात येईल. यामध्ये बूस्टर डोसचा देखील समावेश असेल. या आदेशाची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची विनंती शील यांनी केली आहे.

 

बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुक्त झाल्यानंतर किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुमारे नऊ महिने अँटीबॉडी असते. आयसीएमआरच्या डीजी बलराम भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, लसीपासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीवर भारतात एक अभ्यास झाला आणि जागतिक स्तरावरही संशोधन झाले. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की अँटीबॉडी शरीरात सुमारे नऊ महिने टिकतात.

corona vaccinevaccination guidelines
Comments (0)
Add Comment