: आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ची फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्डकपच्या फायनल शोची तयारी देखील पूर्ण झाली असून प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रीय केले गेले आहे.सर्व गोष्टी योग्य आणि नीट असल्या तरी एका गोष्टीने मात्र सर्वांची काळजी कायम आहे.
भारतात नोव्हेंबर महिन्यात पावसाची शक्यता फार कमी असते. पण हवामानाची अनिश्चितता पाहता आयसीसीने राखीव दिवस ठेवलाय. जेणेकरून पावसामुळे मॅचमध्ये अडथळा निर्माण होऊ नये. जर मॅचमध्ये पाऊस झाला तर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल.मात्र त्यासाठी किमान २० ओव्हरची मॅच झाली पाहिजे. अशा स्थितीत ओव्हर कमी केल्या जातील आणि सुधारीत लक्ष्य दिले जाईल.डकवर्थ लुईस नियमानुसार जर निकाल नाही लागला तर राखीव दिवशी मॅच पूर्ण केली जाईल. राखीव दिवशी आधी जेथे मॅच थांबली होती तेथून पुन्हा सुरू केली जाईल. अशा परिस्थितीत ओव्हर कमी केल्या जाणार नाहीत.जर राखीव दिवशी पाऊस पडला आणि मॅच खेळवणे शक्य झाले नाही तर साखळी फेरीनंतर गुणतक्त्यात जो संघ अव्वल स्थानी होता त्याला विजेता घोषीत केले जाईल.