ॲग्री स्टॅग शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना :- उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी

कृष्णा पिंगळे
सोनपेठ दि.22 ) ः

शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना असुन प्रत्येक शेतकऱ्याने आपला शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी सोनपेठ येथे शेतकऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र देतांना केले .
केंद्र सरकार देश पातळीवर शेतकऱ्यांना युनिक फार्मर्स आयडी देण्यासाठी ॲग्री स्टॅक योजना राबविण्यात येत आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी ‘ॲग्री स्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर सुरू असून ॲग्री स्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहिम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे.
सोनपेठ तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने आपला युनिक फार्मर आयडी काढण्यासाठी नाव नोंदणी करावी या साठी गाव पातळीवर कार्यक्रम राबविण्यात येय आहे. सोनपेठ तहसील कार्यालयात या बाबत आयोजित बैठकीत उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी या योजने बाबत माहिती देऊन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले . यावेळी शेतकरी डॉ मोहन देशमुख, रंगनाथ रोडे, सुधीर बिंदू, कृष्णा पिंगळे,विनायक शिंदे,माऊली गोरे,सतीश जाधव यांच्या सह तहसीलदार सुनील कावरखे, नायब तहसीलदार देवेंद्रसिंह चंदेल मंडळ अधिकारी पंडीत सुरवसे तलाठी अतुल निरडे यांच्या सह महा ई सेवा केंद्राचे राजाराम बर्वे व योगेश नाईकवाडे आदींची उपस्थिती होती.

Comments (0)
Add Comment