महिला व शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ गिरियारोहकांनी सर केले हिमशिखर.

परभणी,दिनांक 21
शेतकरी आणि महिलांचा सन्मान म्हणून देशभरातील गिर्यारोहकांनी एकत्र येत उत्तराखंडमधील वीस हजार फूट उंचीचे हिमशिखर सर करत आगळावेगळा संदेश दिला.या गिर्यारोहकांमध्ये परभणीचे गिर्यारोहक रणजीत कारेगावकर यांचा देखील समावेश होता

देशभरात महिलांचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांनी सन्मान करावा या हेतूने देशभरातील गिर्यारोहकांनी एकत्र येत हिमालयात मोहिमेचे आयोजन केले होते या मोहिमेचे नेतृत्वही हरियाणाची महिला गिर्यारोहक एव्हरेस्टवीर मीनू कालीरामन हिने केले.
दिल्ली येथील राहुल शर्मा यांनी पुढाकार घेत ही मोहीम आखली. राजस्थानचे संदीप सैनी, पंजाबचे गुरप्रीत सिंघ सिंधू , डॉ. सुखवीर सिंग, हरजिंदर सिंग, गुरजीत सिंग, उत्तर प्रदेशचे किरपाल सिंग, दिल्लीचे आरुष सैनी व महाराष्ट्र परभणीचे रणजित कारेगांवकर आदींनी यात सहभाग घेतला.

ही मोहीम 8 सप्टेंबर रोजी सांक्री येथून सुरू झाली,पुढे सीमा मार्गे जात चार मुक्काम करत बेस कॅम्प पर्यंतचा खडतर व डोंगरदरी चढून पार केला. 16 सप्टेंबरला बर्फाळ प्रदेशातून वाट काढत अखेर वीस हजार फूट उंचीचे शिखर गाठले.
या गिर्यारोहकांनी खडतर प्रवास करत वीस हजार फूट उंचीचे शिखर सर केले व शिखरावर तिरंगा ध्वज फडकवला तसेच महिलांचा सन्मान करा अशयाचे फलक देखील झळकवले. त्यासोबतच नुकतीच भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो यांनी केलेल्या यशस्वी चांद्रयान मोहिमेचे कौतुक करण्यासाठी देखील हिम शिखरावर इस्रोचा जयजयकार केला
[6:45 pm, 21/09/2023] Kailas Chavan: पोटो

Comments (0)
Add Comment