पुर्णा,दि 06 (प्रतिनिधी)ः
शहरातील सुशिक्षित नागरिकांची वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या अलंकार नगर परिसरात नाल्याच नसल्याने सांडपाणी व ईतर नाल्यांचे पाणी तुंबल्याने परिसरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले असून केवळ या पाण्याला वाट नसल्याने जागोजागी पाणी साचल्याने डासंचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर वसाहतीतील नागरिकांनी वेळोवेळी नगर परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे ह्या विषयी लेखी तक्रार करूनही प्रशासन मात्र याप्रकरनी सुस्त असल्याचे चित्र आहे, जागोजागी घाण पाण्याची डबकी साचल्याने वाहतुकीस अडथळा तर होतोच आहे, तर प्रचंड प्रमाणात डास वाडल्याने डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजार बळावले आहेत, या प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारी यानी तात्काळ कार्यवाही करत या भागात तात्काळ नाल्याची कामे सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे, अन्यथा आम्ही सारेजण नगर परिषदेसमोर उपोषण करू असाही इशारा ह्या भागातील नागरिकांनी दिला आहे.