962 कोटींच्या विकास कामांचा गडकरींच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

आ. राजेश विटेकर व आ. रत्नाकर गुट्टे यांच्या पाठपुराव्या यश

परभणी,दि 09 ः
जिल्ह्यातील 962 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन सोहळा 10 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता गंगाखेड शहरातील दत्त मंदिर येथे संपन्न होणार आहे.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक विकास मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे, खा. फौजिया खान, खा. संजय जाधव, खा. शिवाजी काळगे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. रमेश कराड, आ. राजेश विटेकर, आ. सुरेश वरपूडकर, आ. बाबासाहेब पाटील, आ. राहुल पाटील, आ. रत्नाकर गुट्टे, आ. मेघनाताई बोर्डीकर आदीची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 बी हा परभणी जिल्हा हद्दीपासून ते देवगाव फाट्यापर्यंतचे काम रखडले होते. या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले होते. परंतु आ. राजेश विटेकर यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाला जोडणाऱ्या धामोणी फाटा – सोनपेठ – पाथरी – सेलू ते देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी व गंगाखेड ते किनगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 के या दोन महामार्गाचे भूमिपूजन व गोदावरी नदीवरील पुलाचे लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 बी. साठी 761 कोटी, राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 के. साठी 162 कोटी व गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी 38 कोटी रुपये असा एकूण 962 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments (0)
Add Comment