श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक केंद्राच्या वतीने महावृक्षारोप अभियानाचे उद्घाटन

 

सेलू – प्रतिनिधी
तालूक्यातील देवला पुनर्वसन येथे श्री स्वामी समर्थ सेवा ,अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत ग्राम व नागरी विकास अभियानातुन गुरूमाऊली यांच्या संकल्पनेतुन एक कोटी  महावृक्षारोपण अंतर्गत ” एक झाड एक सेवेकरी ” महावृक्षारोप अभियान राबविण्यात आले .

यामध्ये जगतगुरू तुकाराम महाराज मंदिर परिसरात गुरूमाऊली मोरे दादा यांचे पुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी संदिप देशमुख, सचिन गोरे ,ह भ प शिवाजी महाराज खवणे,प्रा रामेश्वर गटकळ, शंकर लाटे, नागेश कुलकर्णी, अमोल बारस्कर, सुनील गायकवाड, पांडूरंग ढवळे, शिवाजीराव कोकर, कृष्णा गीते, श्रीराम रेंगे,आदींची प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी नितीनभाऊ मोरे यांनी मार्गदर्शनात जिवन जगण्यासाठी जेवढा श्वास महत्वाचा आहे तेवढेच पर्यावरणासाठी दीर्घकालीन वृक्षलागवड करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी महाराज यांच्या पुजनाने झाली . तर समारोप ह भ प शिवाजी महाराज खवणे यांनी गायलेल्या पसायदानाने झाला.
सुत्रसंचलण ऍड महेश वाडेकर यांनी केले तर सुनिल नवले यांनी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडूरंग ढवळे, केदार लाटे,वसंतराव लाटे, शैलेश बारस्कर, सुमित शर्मा, संजय गव्हाडे, अनंतराव तेलभरे,परमेश्वर तमखाणे,ओम नवघरे,दिपक बनसोडे, गणेश मोगल,योगेश बनसोडे दगडुबा चव्हाण, राजेभाऊ पवार, शिवाजीराव कोकर व श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र महेश नगर, मारोती नगर महिला व पुरूष सेवेकरी यांनी परिश्रम घेतले

Comments (0)
Add Comment