छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित टेनिस बॉल स्पर्धेचे उदघाटन

पूर्णा / प्रतिनिधी – येथील माणुसकी फाउंडेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आर आर सी ग्राउंडवर टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी दि . २४ रोजी संपन्न झाले.

 

येथील आर आर सी ग्राउंडवर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली जगदीश जोगदंड यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद भोळे, मिलिंद कांबळे, प्रक्षित सवनेकर, ॲड. हिरानंद गायकवाड , सुरेंद्र नरवाडे कुंदन ठाकूर , शंकर गायकवाड, आयोजक साकेत कांबळे, कांचन ठाकूर आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

या स्पर्धेतील विजेत्यांना रवी कांबळे, मिलिंद कांबळे, मुकुंद भोळे यांच्या वतीने विजेत्या संघाला ५२ हजार रुपयांची पारितोषिके व चषक बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहेत. याशिवाय वैयक्तिक पातळीवरही खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. अशी माहिती प्रास्ताविकात आयोजक साकेत कांबळे यांनी दिली. मैदानाचे पुजन करून व श्रीफळ वाढवून जगदीश जोगदंड यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी ॲड. हिरानंद गायकवाड यांनी खेळाचे महत्त्व विशद केले. उत्तम खंदारे यांनी पूर्णा येथील १२५ वर्षे जून्या ऐतिहासिक आर आर सी मैदानाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. या मैदानाने देशाला मोठ मोठे खेळाडू दिल्याचे त्यांनी सांगितले. तन व मन सुदृढ, समृद्ध करण्यासाठी चार भिंतींच्या बाहेर पडून क्रीडांगण गाठा असे त्यांनी आवाहन केले.

 

प्रमुख उपस्थितात विराट कुलदीपके, जयकांत कांबळे, प्रशांत जावळे, प्रकाश तिवारी , शंकर गायकवाड, एजाज कादरी, संदीप लोखंडे, सुमित कुलदीपके, सौरभ खरात, सिद्धांत सोनकांबळे, कृष्णा वाघमारे, धैर्यशील जोंधळे, राजरत्न कांबळे, सम्राट कांबळे आदींचा समावेश होता . सुत्रसंचालन अमृत कऱ्हाळे यांनी केले. प्रशांत जावळे यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शौकिनांनी खेळाचा आनंद घेत सहकार्य करावे असे आवाहन ॲड. जितेंद्र सोनसळे, ॲड. अजय गायकवाड, राजकुमार सूर्यवंशी, मनोज खिल्लारे, सुबोध मगरे, साहेबराव सोनवणे यांनी केले आहे.

Comments (0)
Add Comment