Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/jvojvpkf/public_html/wp-includes/functions.php on line 6121
एलपीजी गॅस सिलिंडर महागला, पाहा काय आहे नवीन दर – शब्दराज

एलपीजी गॅस सिलिंडर महागला, पाहा काय आहे नवीन दर

तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ जाहीर केलीय, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर सात रुपयांनी वाढवला आहे. व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 इतकी वाढली आहे. दुसरीकडे, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडर दरात कपात झाली होती. मात्र, मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली. सध्या मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत 1733.50 रुपये आहे. जून महिन्यात हे दर 1725 रुपये होते.  कोलकात्यामध्ये व्यावसायिक गॅसची किंमत 1895.50 रुपये  आहे. तर चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत 1945 रुपये होती.कोलकात्यामध्ये जून महिन्यात 1875.50 रुपये तर चेन्नईमध्ये किंमत 1937 रुपये इतकी होती.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घरगुती गॅसची किंमक 1102 रुपये आहे. कोलकात्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1129 रुपये आहे. इंडियन ऑईल वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये एलपीजी गॅसची किंमत 1118.50 रुपये आहे. तर दिल्लीत  घरगुती गॅसची किंमत 1103 रुपये आहे. दरम्यान या वर्षी मार्च महिन्यात घरगुती गॅसच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कधी वाढल्या होत्या?

सरकारनं 2023 वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये बऱ्याचदा बदल केले आहेत. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींत 83 रुपयांनी कपात करण्यात आली होती. तसेच, मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत घट झाली आणि एका सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर पोहोचली. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2028 रुपये होती. मार्चमध्ये त्याची किंमत सर्वाधिक 2119.50 रुपये होती. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769 रुपये होती.

जूनपासूनच घरगुती सिलेंडरच्या किमती स्थिर

गेल्या काही महिन्यांपासून एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ झाली होती. तसेच, त्याआधी गेल्या वर्षी 6 जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत मार्चपर्यंत 1053 रुपये होती, त्यात 50 रुपयांनी वाढ झाली होती आणि आता घरगुती सिलेंडर 1103 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.

Comments (0)
Add Comment