सेलू,दि 08 ः
येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त सेलू शाखेच्या वतीने 2 ते 6सप्टेंबर या कालावधीमध्ये विमा सप्ताह साजरा करण्यात आला या विमा सप्ताहाच्या निमित्ताने सेलू भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेच्या वतीने, विमा कर्मचारी, विकास अधिकारी, अधिकारी साठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, स्पर्धांचे पारितोषिक वितरण कार्यक्रम 6 सप्टेंबर रोजी अध्यक्षस्थानी प्रभाकर भांडवले (सहाय्यक प्रशासन अधिकारी) योगेश जयभाय (प्रमुख अतिथि) नागेश पुराणिक, सुभाष राठोड यांचे उपस्थितीत झाला, स्पर्धेतील यशस्वी कर्मचाऱ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली, प्रथम क्रमांक प्रभाकर भांडवले व दिव्तीय क्रमांक अमर पाटील तृतीय मन्मथ देवढे , समीर थोरात यांना देण्यात आले,विमा सप्ताह समापन समारोह नागेश पुराणिक,शमशोदिन शेख, उपेंद्र बेल्लुरकर,भास्कर हिप्परगे, योगेश जयभाय, शिवाजी अघाव व संपत कपाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी शमशोदिन शेख,श्रीपती जगताप,कृष्णा बोराडे,भालचंद्र बरडे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवने, संदीप जाधव, बबन झोल, दत्ता सरकटे आदि उपस्थित होते.